विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालक व शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका- डॉ. गोपाळकृष्ण जोशी
संगमेश्वरचा ७३ वा वार्षिक शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
सोलापूर, दि. १४ फेब्रुवारी
कोणत्याही विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व दोन स्तरांवरुन घडत असते. त्यामध्ये त्याचे कुटुंब व महाविद्यालय यांचा समावेश होतो. यातूनच विद्यार्थ्यांवर मूल्यात्मक संस्कार घडतात आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. त्यामुळे पालक व शिक्षक यांची महत्त्वपूर्ण भूमिका विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असते. असे विचार एमआयटी विश्वप्रयाग विद्यापीठ सोलापूरचे संस्थापक कुलगुरू डॉ. गोपाळकृष्ण जोशी यांनी मांडले.
संगमेश्वर कॉलेजमध्ये ७३ व्या वार्षिक शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. धनंजय माने, संस्थेचे चेअरमन मा. धर्मराज काडादी, सचिव प्रा. ज्योती काडादी, व्यवस्थापन समितीचे सदस्य मा. पुष्पराज काडादी, अॅड रा. गो. म्हेत्रस, सौ उमा गोपाळकृष्ण जोशी, शैक्षणिक सल्लागार डॉ. प्रमोद दर्गोपाटील, प्र. प्राचार्य डॉ ऋतुराज बुवा, उपप्राचार्य श्री प्रसाद कुंटे, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, विद्यार्थी प्रतिनिधी विनीत दिनकर तसेच मा. सिध्दराम चाकोते, मा. महादेव जम्मा, मा. प्रभू मंदर्गीकर, मा. रतन रिक्के, माजी प्राचार्य डॉ राजन अन्यापनावर. डॉ राजेंद्र देसाई व प्रा आनंद हुली या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती
कुलगुरु डॉ. जोशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, संगमेश्वर कॉलेजमधील शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनोगतांचे कौतुक केले. हे विद्यार्थी सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले. त्यांनी पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना त्यांनी विविध गोष्टी सांगितल्या. विशेषतः पालकांनी आपली जबाबदारी ओळखत आपल्या पाल्याशी जास्तीत जास्त संवाद साधावा, त्याला वेळ द्यावा, त्याचे मासिक आरोग्य सांभाळावे असा सल्ला दिला. तसेच शिक्षकांनीसुध्दा विद्याथ्यांच्या क्षमता समजून घेऊन त्याच्या ध्येयप्राप्तीसाठी प्रेरीत करावे असे विचार मांडले.
या कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर गीताने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज युवा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. लीना खमितकर यांनी करुन दिला. महाविद्यालयाचे शैक्षणिक अहवाल वाचन प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी केले तसेच विद्यार्थी प्रथमेश पुरुड, श्रुतिका चव्हाण, ऋचा साळुंखे आणि डॉ. ममता बोल्ली यांनी मनोगते व्यक्त केली. शैक्षणिक गुणवत्ता यादीचे वाचन वरिष्ठ विभाग डॉ. विजयकुमार मुलीमनी, कनिष्ठ विभाग प्रा सिध्दाराम विजापूरे तसेच रात्र महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीचे वाचन प्रा गुरुदास धनाते यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते यशस्वी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार विद्याथी प्रतिनिधी विनीत दिनकर याने मानले. सूत्रसंचालन डॉ पुष्पांजली मंत्री, प्रा कोमल कोडा व प्रा. संतोष पवार यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
(फोटो ओळ बोलताना मा. डॉ. गोपाळकृष्ण जोशी, मंचावर अॅड. धनंजय माने, मा. धर्मराज काडादी, प्रा. ज्योती काडादी, सौ. उमा जोशी, अॅड. रा. गो. म्हेत्रस, मा. पुष्पराज काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज युवा, डॉ. प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य प्रसाद कुंटे व विनीत दिनकर)












टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा