बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात
सोलापूर ( दिनांक २१ ) यंदाच्या २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य ' Yoga for Healthy Ageing ' निरोगी वृद्धत्वासाठी योग ' असे आहे. याला अनुसरून संगमेश्वर महाविद्यालय, रात्र विभाग आणि संगमेश्वर च्या विविध संस्थांच्या माध्यमातून योग प्रात्यक्षिकाचे आयोजन संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. यंदाचा बारावा योग दिन उत्साहात साजरा केला. याकरता कॉलेजच्या जिमखाना विभागाने नियोजन केलं होतं. प्रारंभी प्रा.संतोष खेंडे यांनी प्रास्तविक केले. योगशिक्षक अजित कलागते यांनी योग प्रात्यक्षिकांच्या सूचना आणि निवेदन केले. त्यांच्यासोबत प्रा. शिवराज पाटील आणि कॉमर्स विभागाची विद्यार्थिनी स्नेहल जाधव हिने प्रात्यक्षिक केले. संगमेश्वर कॉलेज शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक, कर्मचारी बांधवानी प्रशिक्षकासोबत प्रात्यक्षिके केली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, रा...