नवसंशोधनातूनच समाजाचा विकास होईल : डॉ. खराडे
संगमेश्वरमधील राष्ट्रीय चर्चासत्राचा समारोप संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. २४- नव्या संशोधकांनी समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर द्यावा. कारण अशा नवसंशोधनातूनच समाजाचा विकास होईल असे विचार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉ. महादेव खराडे यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) मधील ग्रंथालय विभाग आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पीएम-उषा अनुदानांतर्गत संशोधन आणि नवनिर्मिती-परिवर्तन घडविण्यासाठी विविध ज्ञानशाखांना ग्रंथालयामध्ये जोडण्याची सराव आणि कार्यपध्दती, भविष्यातील सेवांसाठी एक बहुविद्याशाखीय दृष्टिकोन' या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय समारोपप्रसंगी चर्चासत्राच्या प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा होते. याप्रसंगी ग्रंथपाल डॉ. विजयकुमार मुलीमनी, डॉ. अशोक खोब्रागडे, डॉ. प्रिन्स अजयकुमार आगासे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. खराडे यांनी आपल्या भाषणात नव्या संशोधकांना मूलभूत मार्गदर्शन केले. संशोधकां...