पोस्ट्स

एप्रिल ९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुरक्षितता हीच खरी जबाबदारी - वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी

इमेज
 प्रबोधन कट्ट्याच्या माध्यमातून तीव्र उन्हाळ्याविषयी जनजागृती  सोलापूर ( दिनांक ८ ) सध्या तीव्र उन्हाळा जाणवतो, त्या निमित्ताने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने प्रबोधन कट्ट्याचा उपक्रम प्रतिवर्षी केला जातो. या उपक्रमांतर्गत विविध सामाजिक संदेश दिले जातात आणि लोकांमध्ये जनप्रबोधन घडवून आणले जाते. कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असतो. एप्रिल महिना आला की तीव्र उन्हाळ्याची झळ सर्वच लोकांना लागत असते. यामध्ये आपण काय काळजी घेतली पाहिजे. यासंदर्भात विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधत फलकाच्या द्वारे, घोषणांच्या द्वारे तब्येतीची काळजी घेण्यासाठी प्रबोधन केले, यावेळी हर्षवर्धन पाटील, प्रदीप आर्य, संतोष पवार, मल्लिकार्जुन पाटील, डॉ. गणेश मुडेगावकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी शहर वाहतूक पोलीस नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्रनाथ भंडारी याने उपस्थित या विद्यार्थ्यांमध्ये सहभाग नोंदवून आपले मनोगत व्यक्त केले. या उपक्रमाचे कौतुक केले. उपक्रम यशस्वीतेसाठी उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे यांनी मार्गदर्शन केले.  रवींद्रनाथ भंडारी म्हणाले ...

संगमेश्वर कॉलेजमध्ये बीबीए, बीसीए एमएएच-सीईटी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
संचार प्रतिनिधी  सोलापूर, दि. ७- येथील संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित बीबीए, बीसीए एमएएच-सीईटी मोफत कार्यशाळेला विद्याध्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एमएएच-सीईटी परीक्षेची प्रभावी तयारी व्हावी, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत इंग्रजी, रोझनिंग, सामान्य ज्ञान तसेच संगणक मूलतत्त्वे या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांची गती आणि अचूकता वाढविण्यासोबतच आत्मविश्वास दृढ करण्यासाठी उपयुक्त टिप्सही दिल्या जात आहेत. त्यामुळे परीक्षेत अधिक गुण मिळविण्यास विद्यार्थ्यांना मदत होत आहे. विशेष म्हणजे ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. ही कार्यशाळा १३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, ज्या  विद्यार्थ्यांनी  अद्याप सहभाग नोंदविला नाही त्यांनी उर्वरित दिवसांतसहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहून  संगमेश्वर कॉलेजमधील कार्यशाळेस मोठ्या संख्येने  या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी प्रा. डॉ....

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहाचे उद्घाटन

इमेज
आपण कितीही मोठे झालो तरी माणुसकी जपली पाहिजे पद्मश्री ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे प्रतिपादन संचार प्रतिनिधी ,  सोलापूर, दि. ३१-  आपण ज्ञानी असून उपयोग नाही तर माणूसही असायला हवे. आपण कितीही मोठे झालो तरी माणुसकी जपली पाहिजे, असे प्रतिपादन पद्मश्री तथा राज्यसभेचे खासदार विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी केले. मंगळवारी, प्रा. ठाकरे गौरव संस्था, संगमेश्वर महाविद्यालय आणि लक्ष्मी हायड्रॉलिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने आयोजित संगमेश्वर महाविद्यालयात नव्याने उभारण्यात आलेल्या कर्मयोगी अप्पासाहेब काडादी सभागृहाचे उद्घाटन आणि 'राष्ट्रीय गणितरत्न पुरस्कार वितरण सोहळ्यात पद्मश्री अॅड. निकम बोलत होते. विज्ञान संस्था बंगळुरू येथील प्रा. वामसी प्रीतम पिंगाली यांना गणितरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मी हायड्रोलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे होते. याप्रसंगी विचारपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, संस्थेचे अध्यक्ष विधिज्ञधनंजय माने, संस्थेच्या सचिव ज्योती काडादी, माजी कुलगुरू तथा प्रा. ठाकरे गौरव संस्थेचे अध्यक्ष डॉ...