बारावीनंतरच्या करिअर व्याख्यानात संजय कुलकर्णी यांचे मार्गदर्शन

 विद्यार्थ्यांनो अपडेट राहा, अन्यथा आउटडेटेडचा धोका -संजय कुलकर्णी 

सोलापूर, दि. १२० आजच्या वेगाने बदलवाया युगात्र कोणतेही करिअर क्षेत्र निवाले तरी त्यात संधींची कमतरता नाही. मात्र, स्वतःला सातत्याने अदावावत ठेवणे, कोशल्ये विकसित करणे आणि गुणवत्तापूर्ण काम करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी अपडेट राहिले पाहिजे, अन्यथा आउटडेटेड होण्याचा पोका आहे. कृत्रिम बुद्धिमता (आप) हे तंत्रज्ञान भविष्यातील अनेक संधी निर्माण करणार असले तरी मानवी भावना, संवेदना आणि नातेसंबंध समजून घेण्याची समता केवळ माणसाकडेच आहे. त्यामुळे एआयचे ज्ञान आत्मसात करतानाच मानवी मूल्य जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समुपदेशक व संगमेश्वर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संजय कुलकर्णी यांनी केले.

शुक्रवारी, संगमेश्वर स्वापयांचा महाविद्यालयातील कला वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बारावीनंतरच्या करिअर संधी या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी. बी. नाडगोडा हे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे शैक्षणिक व मूल्यमापन सल्लागार डॉ. प्रमोद दगर्योपाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय प्राचार्य डॉ. ऋतुराज युवा यांनी करून दिला. कुलकर्णी माणाले, विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअरची निवड करावी आणि त्या क्षेत्रात उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी जीव ओतून मेहनत घ्यावी, खेळ, कला, मानसशाख, तंत्रज्ञान, व्यवसाय, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. समाजाच्या गरजा आणि स्वतःच्या क्षमता यांचा योग्य अभ्यास करून करिअरची दिशा ठरविणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले, मानसशास क्षेत्राता भविष्यात मोठी मागणी राहणार आहे. प्रभावी संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि लोकांशी जुळवून घेण्याची क्षमता असलेल्या व्यक्तींना विविध क्षेत्रांत उत्तम संधी मिळू शकतात. तसेच गुंतवणूक सल्लागार हे क्षेत्रही वेगाने विकसित होत असून आगामी काळात त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होणार आहेत.

कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना एआयचे ज्ञान घेण्याचे आवाहन करताना सांगितले की, ज्याला एआय समजणार नाही तो मविष्यातील स्पर्धेत मागे पडू शकतो. त्यामुळे तंत्रज्ञानाचा योग्य वापर, संगणकाचे ज्ञान आणि सातत्याने अभ्यास करण्याची सवय विद्याथ्यांनी लावून घेतली पाहिजे, व्यक्तिमत्व विकासाचे महत्व सांगताना ते म्हणाले, करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी केवाठ शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. प्रत्येक विद्यायांता मातृभाषेसह इंग्रजी आणि आणखी एक भाषा अवगत असणे गरजेचे असून सामान्य ज्ञान अद्ययावत ठेवण्यावरही भर दिला पाहिजे. काळ बदलला आहे. पालकांनीही बदलत्या परिस्थितीचा स्वीकार करून मुलांच्या आवडी निवडी समजून घेत त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन दिले पाहिजे. मुलांचा उत्साह वाढविण्यासाठी पातकांनी सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. 

अध्यक्षीय समारोपात सी.बी.नाडगौडा यांनी महाविद्यालयीन उपक्रमाचे कौतुक केले. आजच्या समुपदेशनातून विद्यार्थ्यांना जीवनाची नवी माहिती मिळाली आहे. या ज्ञानाचा फायदा आपल्या भविष्यासाठी करून घ्यावा, तसे योग्य नियोजन विद्याध्यांनी करावे असे आवाहन त्यांनी केले.प्रा. डॉ. राजकुमार मोहरकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. या कार्यक्रमास वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. व्ही. के.पुरोहित, डॉ दत्तकुमार म्हमाणे विद्यार्थी पालक उपस्थित होते. 

व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्या

नोकरीच्या मुलाखतीत अनेकदा आमध्याकडे हजारों अर्ज आले आहेत आणि जागा मर्यादित आहेत, मग आम्ही तुलाच का निवडावे? असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पद‌वीसोबत व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिल्यास स्पर्धेत टिकून राहणे आणि यश मिळवणे अधिक सोपे होते, असा सल्ला संजय कुलकर्णी यांनी दिला.

'संगमेश्वर' मध्ये रोजगाराभिमुख अभ्यासक्रम

आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ बी.ए. किंवा बी.कॉम.ची पदवी पुरेशी नसून त्यासोबत रोजगाराभिमुख आणि स्पर्धा परीक्षा केंद्रित अभ्यासक्रमांची निवड करणे महत्त्वाचे ठरते. संगमेश्वर महाविद्यालयात असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रशासन, व्यवस्थापन, बैंकिंग, उद्योग, उद्योजकता आणि शासकीय सेवांमध्ये करिअर घडविण्यास मदत करतात. बीबीएमुळे व्यवस्थापन, नेतृत्व, संवाद कौशल्य आणि व्यवसाय ज्ञान विकसित होते तर यूपीएससी, एमपीएससी अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची संधी देतात, असा विश्वास संजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

'संगमेश्वर' विषयी कृतज्ञतेची भावना

संगमेश्वर महाविद्यालयातील तत्कालीन गुरुजनांनी दिलेले संस्कार, मार्गदर्शन आणि मूल्यांमुळेच माझे व्यक्तिमत्त्व चहले. विद्यार्थी म्हणून या महाविद्यालयात घालविलेला काळ आजही माझ्या स्मरणात ताजा आहे. ज्या महाविद्यालयात शिकलो, आज त्याच महाविद्यालयात मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली, महाविद्यालयाने उभारलेले भव्य सभागृह, आधुनिक सुविधा आणि शैक्षणिक प्रगती पाहून मन अभिमानाने भरून येते. संस्थेने काळानुसार केलेली ही प्रगती प्रेरणादायी आहे. माझी दूसरी पिढीही याच महाविद्यालयात शिक्षण घेऊन सक्षम झाली. आज ती आपल्या कार्यक्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. त्यामुळे या संस्थेबद्दल माझ्या मनात विशेष ऋणानुबंध आणि कृतज्ञतेची भावना असल्याचे उद्‌गार काढत ज्येष्ठ समुपदेशक संजय कुलकर्णी यांनी तत्कालीन प्राचार्य के. भोगिशयन व नरेश बदनोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.



 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के