विज्ञान शाखेचा सारंग पवार कॉलेजमधून सर्वप्रथम
सोलापूर प्रतिनिधी - दिनांक ( २ मे )
येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे - कला शाखा ८५.७१ ,वाणिज्य ८६.९२ , विज्ञान ९८.७६ टक्के इतका लागला.विज्ञान शाखेचा सारंग संतोष पवार ( ९०.१७) कॉलेजमधून सर्वप्रथम आला तर कला विभागातून - तेजस्विनी पृथ्वीराज देशमुख (८५.५०) टक्के घेऊन प्रथम आली..वाणिज्य शाखेतून त्रिवेणी संतोषकुमार आमाणे (८९.३३) हिने प्रथम येण्याचा मान मिळवला.
 |
| सारंग संतोष पवार ( ९०.१७) |
निकाल याप्रमाणे - वाणिज्य शाखा - प्रथम - त्रिवेणी संतोषकुमार आमाणे (८९.३३) द्वितीय - केया राहुलकुमार भैय्या ( ८६.६७) तृतीय - कौस्तुभ मच्छिंद्र पाटील ( ८६.१७ ) . कला शाखा - तेजस्विनी पृथ्वीराज देशमुख -प्रथम (८५.५०) मोहिनी अंबादास आडकी- द्वितीय (८५.००) रक्षता रवींद्रप्पा घुगरे - तृतीय क्रमांक -(८२.६७ ). विज्ञान शाखा - सारंग संतोष पवार - प्रथम (९०.१७ ) चरण संतोष दासरी -द्वितीय (८७.००) श्रेया लक्ष्मण तोडकर - तृतीय (८३.७४ )
 |
| कला शाखा - तेजस्विनी पृथ्वीराज देशमुख -प्रथम (८५.५०) |
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी यशस्वी विद्यार्थी - त्रिवेणी आमाणे,मोहिनीआडकी,भाग्यश्री आळगे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सचिन देवडीकर या पालकानी देखील आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपले आईबाबा , कॉलेज आणि आपल्या शिक्षकांना दिले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी , सचिव मा. ज्योती काडादी , प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक, डॉ.मल्लिनाथ साखरे ,विज्ञान शाखा समन्वक प्रा.विशाल जत्ती, वाणिज्य समन्वयक प्रा. बाबासाहेब सगर यांनी कला शाखा समन्वयक प्रा.शिवशरण दुलंगे यांच्यासह सर्व विभागातील प्राध्यापकवृंद , कर्मचारी आदींनी अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस बी निंबर्गी यांनी केले तर पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे यांनी सर्वांचे आभार मानले.
 |
| वाणिज्य शाखा - प्रथम - त्रिवेणी संतोषकुमार आमाणे |
*चौकट*- बारावीनंतरच्या कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील शिक्षणासाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार संगमेश्वर कॉलेज सज्ज आहे. आपण या उज्वल शैक्षणिक प्रवासात सहभागी होऊन संगमेश्वर कॉलेजचे नाव उज्वल करत आहात.याचा सर्वांना आनंद आहे.तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ---.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा
 |
| मोहिनी अंबादास आडकी- द्वितीय (८५.००) |
 | | केया राहुलकुमार भैय्या ( ८६.६७) तृतीय |
 | | चरण संतोष दासरी -द्वितीय (८७.००) |
 | | कला शाखा | मोहिनी अंबादास आडकी- द्वितीय (८५.००) |
 |
| केया राहुलकुमार भैय्या ( ८६.६७) तृतीय |
 |
| चरण संतोष दासरी -द्वितीय (८७.००) |
 |
कला शाखा - रक्षता रवींद्रप्पा घुगरे - तृतीय क्रमांक
|
 |
| तृतीय - कौस्तुभ मच्छिंद्र पाटील ( ८६.१७ ) . |
 |
| लक्ष्मण तोडकर - तृतीय (८३.७४ ) |
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा