पोस्ट्स

जुलै १३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतून आपले नाव उज्वल करा. - उपप्राचार्य प्रसाद कुंटे

इमेज
   उपप्राचार्य यांच्या अभिभाषणाने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत   सोलापूर ( दिनांक २८ जुलै ) "  प्रत्येक शाखेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. कला शाखा संवेदनशील, सर्जनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व घडवते. वाणिज्य शाखा उद्योग, व्यवसाय आणि आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान देते. विज्ञान शाखा संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाची दारे उघडते.             यश हे शाखेवर अवलंबून नसून विद्यार्थ्याच्या जिद्द, परिश्रम, शिस्त आणि सातत्यावर अवलंबून असते. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकण्याचा संकल्प करा. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते.असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रसाद  कुंटे यांनी केले ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांच्या अभिभाषण आणि स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.या प्रसंगी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.शाखानिहाय विभागप्रमुखांच्या...