पोस्ट्स

जुलै १८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष मुलांनी सीमेवरील सैनिकांसाठी पाठवल्या राख्या

इमेज
स्वगती शाळेत साजरे झाले अनोखे रक्षाबंधन   सैन्यदलातील सैनिक अन अधिकारीही भारावले सोलापूर : प्रतिनिधी सैनिकांना भेटण्यासाठी आतुर असलेली विशेष मुले… हातात त्यांनीच बनवलेल्या राख्या अन ओवाळणीचे ताट…सैनिक शाळेत येताच झालेला ‘भारतमाता की जय’ चा जयघोष अशा उत्साहाने व देशभक्तीने भारलेल्या वातावरणात शुक्रवारी सीमेवरील सैनिकांना सोलापुरातील विशेष मुलांनी राख्या पाठवल्या. रोटरी रेडक्रॉस स्वगती शाळेच्या प्रांगणात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी व्यासपीठावर ९ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे सीएचएम हरजीत सिंग, युवराज देसवले, राहुल धुमाळ, संगमेश्वर महाविद्यालयाच्या असोसिएट एनसीसी ऑफिसर कॅप्टन शिल्पा लब्बा, असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट तुकाराम साळुंखे, शाळेच्या अध्यक्षा गीता बालिगा उपस्थित होते. याप्रसंगी स्वगती शाळेच्या विशेष मुलांनी सैनिकांना राख्या बांधून, औक्षण करून राख्या सीमेवरील सैनिकांसाठी त्यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यांच्या या उपक्रमाचे अधिकारी आणि सैनिकांनी कौतुक केले. विशेष मुलांसाठी चालविल्या जाणाऱ्या रोटरी रेडक्रॉस स्वगती स्वगती शाळेतील मुलींनी राखी बांधल्याने भारतीय सैन्य दलातील अ...