पोस्ट्स

जुलै १७, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा – मनोज राऊत

इमेज
सिव्हिल सर्व्हिसेस विभागाच्या वतीने स्पर्धा परीक्षेवर व्याख्यान  सोलापूर, दि. १७ जुलै २०२६ : "संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची आवड ओळखून त्यानुसार आवश्यक क्षमता विकसित केली पाहिजे. निरर्थक इंटरनेट स्क्रोलिंगपासून दूर राहून वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते," असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (Deputy CEO) मा. मनोज राऊत यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज, सोलापूर येथील बी.ए. सिव्हिल सर्व्हिसेस विभागाच्या वतीने आयोजित विद्यार्थी असोसिएशन उद्घाटन व मार्गदर्शन व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा,उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहोरकर आदी उपस्थित होते. स्पर्धा परीक्षा व प्रशासकीय सेवा या विषयावर पुढे  बोलताना मनोज राऊत म्हणाले, "मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं करण्याची तयारी ठेवा. मोबाईल आणि इंटरनेटचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता ज्ञान संपादन, कौशल्यविकास आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी करा. सकारात्म...

मराठी भाषा विदयार्थ्यांना जगण्याचे मार्ग दाखवते - प्रा.डॉ.इ.जा.तांबोळी

इमेज
संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन  सोलापूर प्रतिनिधी -  १२ जुलै -  ''मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून ज्ञान, संस्कृती, विचार आणि रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध करून देणारी समृद्ध भाषा आहे. आजच्या डिजिटल युगात मराठी भाषेचे महत्त्व अधिक वाढले असून विविध क्षेत्रांमध्ये मराठी जाणकारांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत आहेत.                      मराठी विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अध्यापन, पत्रकारिता, संपादन, वृत्तनिवेदन, आकाशवाणी व दूरदर्शन, प्रकाशन व्यवसाय, जाहिरात लेखन, अनुवाद, दुभाषी सेवा, पटकथा व संवाद लेखन, ब्लॉग लेखन, डिजिटल कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया व्यवस्थापन, ई-लर्निंग, संशोधन, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये भाषा तज्ज्ञ म्हणून काम करण्याच्या अनेक संधी आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण (NEP 2020) आणि मातृभाषेला मिळणारे वाढते महत्त्व यामुळे मराठी विषयातील तज्ज्ञांची गरज अधिक वाढत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई-पुस्तके, संकेतस्थळे, मोबाईल अॅप्स आणि डिजिट...

कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल - विशाल साळुंके

इमेज
 आयसीएसआय आणि संगमेश्वर कॉलेज यांच्या सामंजस्य करार  सोलापूर प्रतिनिधी -  संगमेश्वर महाविद्यालय नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उद्योगजगताशी विद्यार्थ्यांचा सेतू निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहिले आहे. हा सामंजस्य करार त्या प्रयत्नांना अधिक बळ देणारा ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणे आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा सामंजस्य करार त्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी व्यवसायाची ओळख, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, सेमिनार, करिअर समुपदेशन, कौशल्य विकास कार्यक्रम, इंटर्नशिपच्या संधी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नव्या घडामोडींचे ज्ञान मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना रोजगार तसेच व्यावसायिक क्षेत्रात अधिक सक्षम बनण्यास मदत होईल.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा मिळेल, अशी खात्री आहे.'' असे मत सीएस द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे चेअर...