कला,वाणिज्य व विज्ञान शाखेतून आपले नाव उज्वल करा. - उपप्राचार्य प्रसाद कुंटे

  


उपप्राचार्य यांच्या अभिभाषणाने अकरावीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत  

सोलापूर ( दिनांक २८ जुलै ) "  प्रत्येक शाखेचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. कला शाखा संवेदनशील, सर्जनशील आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व घडवते. वाणिज्य शाखा उद्योग, व्यवसाय आणि आर्थिक व्यवस्थापनाचे ज्ञान देते. विज्ञान शाखा संशोधन, तंत्रज्ञान आणि नवोपक्रमाची दारे उघडते.

            यश हे शाखेवर अवलंबून नसून विद्यार्थ्याच्या जिद्द, परिश्रम, शिस्त आणि सातत्यावर अवलंबून असते. आपल्या आवडीचे क्षेत्र निवडा, मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा. प्रत्येक दिवस नवीन काहीतरी शिकण्याचा संकल्प करा. शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा विश्वास आणि स्वतःची मेहनत यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते.असे प्रतिपादन उपप्राचार्य प्रसाद  कुंटे यांनी केले ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांच्या अभिभाषण आणि स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात बोलत होते.या प्रसंगी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील सर्व प्राध्यापक मंडळी उपस्थित होते.शाखानिहाय विभागप्रमुखांच्या प्रास्ताविकानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार झाले. सत्कारानंतर प्रत्येक विषय शिक्षकांनी आपापल्या परिचय करून दिला.  

उपप्राचार्य पुढे म्हणाले  ,''आपण आपल्या शाखेचा, महाविद्यालयाचा आणि पालकांचा अभिमान वाढवूया. आपल्या ज्ञान, चारित्र्य आणि कर्तृत्वाने समाजात आदर्श निर्माण करूया. वाणिज्य, विज्ञान आणि कला या कोणत्याही शाखेतून शिक्षण घेत असलो तरी उत्कृष्ट कामगिरी करून आपले नाव उज्ज्वल करूया

               ज्युनियर कॉलेज हा करिअर घडविण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. कला शाखा निवडणारे विद्यार्थी केवळ पदवीपर्यंत मर्यादित राहत नाहीत, तर प्रशासकीय सेवा, पत्रकारिता, अध्यापन, कायदा, सामाजिक कार्य, भाषा-साहित्य, मानसशास्त्र, पर्यटन, स्पर्धा परीक्षा अशा अनेक क्षेत्रांत यशस्वी होऊ शकतात. या दोन वर्षांत वाचन, लेखन, संवादकौशल्य, चिकित्सक विचार आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर भर द्या. प्रत्येक संधीचा उपयोग करून स्वतःची गुणवत्ता वाढवा. आजची योग्य पूर्वतयारी उद्याच्या यशस्वी करिअरचा मजबूत पाया ठरेल. आत्मविश्वास, शिस्त आणि सातत्य हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

        विज्ञान शाखा ही संशोधन, नवोपक्रम आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे विश्व खुलं करणारी शाखा आहे. ज्युनियर कॉलेजमधील शिक्षण हे अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण, संगणक विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, जैवतंत्रज्ञान आणि मूलभूत विज्ञानातील करिअरची भक्कम पूर्वतयारी आहे. संकल्पना समजून घेण्याची सवय, प्रयोगशील वृत्ती, गणिती विचार आणि सातत्यपूर्ण अभ्यास यांवर भर द्या. स्पर्धा परीक्षांची तयारीही याच काळात सुरू करा. मेहनत, शिस्त, जिज्ञासा आणि आत्मविश्वास यांच्या बळावर तुम्ही देशाच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक प्रगतीत महत्त्वाचे योगदान देऊ शकता.''

डॉ. मल्लिनाथ साखरे यावेळी  बोलताना विविध सूचना देत  म्हणाले,'' वाणिज्य शाखा ही उद्योग, व्यवसाय आणि आर्थिक व्यवस्थापनाची दारे उघडणारी शाखा आहे. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकताना लेखाशास्त्र, अर्थशास्त्र, व्यवसाय अभ्यास, संगणकीय कौशल्ये आणि संवादकौशल्य यांवर प्रभुत्व मिळवा. सीए, सीएस, सीएमए, बी.कॉम., एमबीए, बँकिंग, वित्त, करसल्लागार, उद्योजकता अशा विविध करिअरच्या संधी तुमच्यासमोर आहेत. नियमित अभ्यास, वेळेचे नियोजन आणि प्रामाणिक प्रयत्न यामुळे यश निश्चित मिळते. ज्ञानासोबत नैतिक मूल्ये आणि व्यावसायिक प्रामाणिकपणा जपल्यास तुम्ही समाजात सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून निश्चितच नाव कमवाल.आपले मनपूर्वक स्वागत '' 

कला शाखेचे सूत्रसंचालन दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी केले, तर वाणिज्य शाखेचे संगीत म्हमाणे यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या नावाचे यादी वाचन रवींद्र बिराजदार आणि विश्वनाथ कक्कळमेली यांनी केले.आभार शंकर कोमुलवार आणि वाणिज्य शाखेचे आभार तेजश्री तळे  यांनी मानले. याप्रसंगी कला, वाणिज्य  विभागातील बहुसंख्य विद्यार्थीवर्ग उपस्थित होता.

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के