कंपनी सेक्रेटरीच्या अभ्यासातून विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळेल - विशाल साळुंके


 आयसीएसआय आणि संगमेश्वर कॉलेज यांच्या सामंजस्य करार 


सोलापूर प्रतिनिधी -

 संगमेश्वर महाविद्यालय नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उद्योगजगताशी विद्यार्थ्यांचा सेतू निर्माण करण्यासाठी कटिबद्ध राहिले आहे. हा सामंजस्य करार त्या प्रयत्नांना अधिक बळ देणारा ठरेल, असा आम्हाला विश्वास आहे.आजच्या स्पर्धात्मक आणि कौशल्याधारित युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नाही, तर विद्यार्थ्यांना उद्योगविश्वाशी जोडणे आणि त्यांना प्रत्यक्ष अनुभव देणे तितकेच महत्त्वाचे आहे. हा सामंजस्य करार त्या दिशेने उचललेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. विद्यार्थ्यांना कंपनी सेक्रेटरी व्यवसायाची ओळख, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, कार्यशाळा, सेमिनार, करिअर समुपदेशन, कौशल्य विकास कार्यक्रम, इंटर्नशिपच्या संधी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील नव्या घडामोडींचे ज्ञान मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना रोजगार तसेच व्यावसायिक क्षेत्रात अधिक सक्षम बनण्यास मदत होईल.विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास नवी दिशा मिळेल, अशी खात्री आहे.'' असे मत सीएस द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया पुणे चॅप्टरचे चेअरमन विशाल साळुंखे यांनी मांडले.  

                  ते संगमेश्वर कॉलेज आणि द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी करियर इन कंपनी सेक्रेटरी या विषयाच्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्र. प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा होते. व्यासपीठावर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रसाद कुंटे,वरिष्ठ विभागाच्या उपप्राचार्य वंदना पुरोहित उपस्थित होते.

                                                                    प्रारंभी द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया च्या सदस्यांनी भेट घेतली असता संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.ज्योती काडादी यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय गौरव जुदगार यांनी करून दिला.त्यानंतर कॉलेजच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार झाला.त्यानंतर द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया चे सदस्य सीएस दिपाली भद्रे,सीएस विशाल पाटील, सीएस शशिकांत बमणी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री तळे यांनी केले तर कनिष्ठ विभाग वाणिज्य विभागाचे समन्वयक बाबासाहेब सगर यांनी सर्वांचे आभार मानले.कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक मंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

चौकट -हा सामंजस्य करार केवळ दोन संस्थांमधील करार नसून, तो ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता आणि उज्ज्वल भविष्यासाठीची एक दृढ भागीदारी आहे. या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांना नवीन संधी उपलब्ध होतील आणि महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेतही निश्चितच भर पडेल, असा आम्हाला विश्वास आहे. -प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ९२.२७ टक्के