पोस्ट्स

ऑगस्ट १३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्याने जाणून घेतला भारतीय हवामान विभाग

इमेज
संगमेश्वर कालेज कनिष्ठ भूगोल विभागाची क्षेत्रभेट  सोलापूर प्रतिनिधी - ११ ऑगस्ट  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ भूगोल विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या क्षेत्रभेटीच्या निमित्ताने भारतीय हवामान विभाग, सोलापूर कार्यालयास भेट देण्यात आली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना हवामान विभागाचे कार्य, हवामान निरीक्षणाची पद्धत आणि हवामानाचा अंदाज वर्तविण्याची प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. भारतीय हवामान विभागामार्फत तापमान, हवेचा दाब, आर्द्रता, वाऱ्याचा वेग व दिशा, पर्जन्यमान आणि इतर वातावरणीय घटकांचे नियमित निरीक्षण केले जाते. यासाठी विविध आधुनिक उपकरणे व तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. संकलित केलेल्या हवामानविषयक माहितीचे विश्लेषण करून पाऊस, उष्णता, वादळी वारे, चक्रीवादळे आदी हवामानविषयक घटनांचा अंदाज वर्तविला जातो.                       क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांना हवामान निरीक्षणासाठी वापरण्यात येणारी उपकरणे प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती जाणून घेण्याची संधी मिळाली. हवामानाची माहिती शेती, जलव्यव...