संगमेश्वर कॉलेजमध्ये बीबीए, बीसीए एमएएच-सीईटी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद



संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. ७-

येथील संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित बीबीए, बीसीए एमएएच-सीईटी मोफत कार्यशाळेला विद्याध्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एमएएच-सीईटी परीक्षेची प्रभावी तयारी व्हावी, या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.या कार्यशाळेत इंग्रजी, रोझनिंग, सामान्य ज्ञान तसेच संगणक मूलतत्त्वे या विषयांवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन केले जात आहे. विद्यार्थ्यांची गती आणि अचूकता वाढविण्यासोबतच आत्मविश्वास दृढ करण्यासाठी उपयुक्त टिप्सही दिल्या जात आहेत. त्यामुळे परीक्षेत अधिक गुण मिळविण्यास विद्यार्थ्यांना मदत होत आहे.

विशेष म्हणजे ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. ही कार्यशाळा १३ एप्रिलपर्यंत सुरू राहणार असून, ज्या  विद्यार्थ्यांनी  अद्याप सहभाग नोंदविला नाही त्यांनी उर्वरित दिवसांतसहभागी व्हावे, असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी नियमित उपस्थित राहून  संगमेश्वर कॉलेजमधील कार्यशाळेस मोठ्या संख्येने 

या संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी प्रा. डॉ. के. पी. गलानी यांना ९०२८३०३०७७आणि प्रा. बी. एस. बुक्कायांना ९५०३३३७२२७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी