संगमेश्वर महाविद्यालयात उद्यापासून राष्ट्रीय चर्चासत्र

 संचार प्रतिनिधी

सोलापूर, दि. २१-

▶ संगमेश्वर कॉलेजमधील ग्रंथालय विभाग आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे ज्ञानस्त्रोत केंद्र, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा अनुदानांतर्गत २३ व २४ मार्च रोजी संगमेश्वर महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

या चर्चासत्राचे बीजभाषण कलबुर्गी विद्यापीठातील आयक्युएसी ग्रंथपाल व संचालक डॉ. सुरेश जंगे हे करणार आहेत. पहिल्या सत्रात

डॉ. प्रिन्स अजयकुमार आगासे, मातृसेवा संघ, 'आंतरविद्याशाखीय ग्रंथपाल, नागपूर, संशोधनशास्त्राची मूलतत्त्वे' या विषयावर विचार मांडतील. दुसऱ्या सत्रात डॉ. अशोककुमार खोब्रागडे 'संशोधनातील विविध तंत्रे' या विषयावर मार्गदर्शन करतील.

दुसऱ्या दिवशी विरेश हंचीनाड, सहाय्यक ग्रंथपाल, टीआयएसएस, तुळजापूर, 'कृत्रिम बुद्धिमत्तेचा संशोधनातील वापर' यावर मार्गदर्शन करतील, तर पाचव्या सत्रात डॉ. गविसिध्दप्पा आनंद हळ्ळी 'गणितीय माहितीचा संशोधनातील वापर' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत.







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी