संशोधनासाठी ग्रंथालये ठरतात प्रभावी ज्ञानस्रोत संगमेश्वरमधील राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. सुरेश जंगे यांचे प्रतिपादन
संचार प्रतिनिधी
सोलापूर, दि. २३-
आजच्या संशोधन हे शिक्षणव्यवस्थेचे महत्त्वाचे अंग बनले असून, त्यासाठी ग्रंथालये अत्यावश्यक भूमिका बजावत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्रंथालये केवळ पुस्तकसंग्रह न राहता माहितीच्या आदानप्रदानाची केंद्रे बनली आहेत. त्यामुळे संशोधनासाठी ती प्रभावी ज्ञानस्रोत ठरतात, असे प्रतिपादन गुलबर्गा विद्यापीठाचे आयक्युएसी प्रमुख व ग्रंथपाल डॉ. सुरेश जंगे यांनी केले.
येथील पहिले स्वायत्त महाविद्यालय असलेल्या संगमेश्वर महाविद्यालयात आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कर्मयोगी मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा अनुदानांतर्गत संशोधन आणि नवनिर्मिती' या विषयावर दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी डॉ. जंगे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. प्रमोद दगोपाटील होते. यावेळी डॉ. ए. ए. घनवट, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. विजयकुमार मुलीमनी आदी मान्यवर उपस्थित होते.
बीजभाषणात डॉ. जंगे यांनी ग्रंथालयांचे आधुनिक स्वरूप स्पष्ट करत संशोधनासाठी उपलब्य संदर्भ साधनांचा आढावा घेतला. यूजीसीच्या नियमानुसार झालेले बदल त्यांनी अधोरेखित केले तसेच ऑनलाइन स्रोतांचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. दगोंपाटील यांनी ग्रंथालये ही। संशोधनाची समृद्ध साधनसंपत्ती असल्याचे सांगितले, ग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे आणि कोश यांच्या प्रभावी वापरातून संशोधन अधिक सक्षम होते, असे त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रास्ताविकात विजयकुमार मुलीमनी यांनी राष्ट्रीय चचर्चासत्रामागील भूमिका स्पष्ट केली. स्वागत प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पुष्पांजली मेत्री व डॉ. सोनाली गिरी यांनी केले. संतोष कुलकर्णी यांनी आभार मानले. या चर्चासत्रात देशभरातून ११० संशोधक सहभागी झाले होते.

.jpeg)

.jpeg)





टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा