खेळाबरोबर शिक्षणाला महत्त्व द्या- राजीव देसाई

संगमेश्वरचा ७३ वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

सोलापूर, दि. १४ फेब्रुवारी :

महाविद्यालयीन जीवनात खेळ हा महत्त्वाचा असतो. यातून शारीरिक आरोग्य सुधारते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने खेळाला महत्त्व दिले पाहिजे. परंतु अलीकडच्या काळात खेळाबरोबर नोकरी मिळविण्यासाठी शिक्षण घेणे गरजेचे ठरले आहे. किमान शैक्षणिक पात्रता प्रत्येक खेळाडूंनी प्राप्त केल्यास करियरच्या उत्तम संधी मिळवता येतील. त्यामुळे खेळाडूंनी खेळाबरोबरच शिक्षणाला महत्त्व द्यावे असे विचार सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे मानद सचिव श्री. राजीव देसाई यांनी मांडले.

संगमेश्वर कॉलेजमध्ये ७३ व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड धनंजय माने, संस्थेचे चेअरमन मा. धर्मराज काडादी, सचिव प्रा. ज्योती काडादी, शैक्षणिक सल्लगार डॉ. प्रमोद दर्गापाटील, प्र. प्राचार्य डॉ. ऋऋतुराज युवा, उपप्राचार्य श्री. प्रसाद कुंटे, जिमखाना प्रमुख प्रा. आनंद चव्हाण, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस. डी. गोटे, के. अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. सचिन गायकवाड, विद्याथी प्रतिनिधी विनीत दिनकर या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

श्री. देसाई यांनी विद्याथ्यर्थ्यांना मार्गदर्शन करताना क्रीडा क्षेत्रातील बदल सांगितले. पूर्वी खेळासाठी फारशा सुविधा नव्हत्या, परंतु खेळाला महत्त्वाचे स्थान होते. संगमेश्वर सारख्या महाविद्यालयात खेळाडूंना प्रोत्साहन दिले जात होते. ही परंपरा आजही सुरु आहे. याचा अभिमान वाटतो. आजच्या काळात खेळाला जोडून शासकीय नोकरी मिळण्याची संधी प्राप्त झाली आहे. खेळाडूंसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडूंनी मोबाईलला बाजूला ठेऊन खेळामध्ये प्रामाणिकपणे भाग घ्यावा रोज व्यायाम करावा. कोणत्याही एका खेळाची आवड जोपासावी असे विचार मांडले.

या कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर गीताने झाली. स्वागत व प्रास्ताविक प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. शिवराज पाटील यांनी करुन दिला. जिमखाना अहवाल व वरिष्ठ क्रीडा पारितोषिक यादी वाचन डॉ. आनंद चव्हाण यांनी केले. प्रा. संतोष खंडे यांनी कनिष्ठ विभाग तर प्रा. शरण वांगी यांनी संगमेश्वर रात्र महाविद्यालयाच्या क्रीडा पारितोपिक यादीचे वाचन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाप्रशिक्षकांचा व यशस्वी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार विद्याथीं प्रतिनिधी विनीत दिनकर याने मानले. सूत्रसंचालन डॉ. पुष्पांजली मेत्री, प्रा. कोमल कोंडा व प्रा. संतोष पवार यांनी केले. याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


(फोटो ओळ बोलताना मा. राजीव देसाई, मा. धर्मराज काडादी, अॅड धनंजय माने, प्रा. ज्योती काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, डॉ. प्रमोद दर्गापाटील, प्राचार्य डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, डॉ. आनंद चव्हाण व विनीत दिनकर).\

















टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संगमेश्वरच्या एनसीसी कॅडेटची दिल्लीतल्या थलसेना कॅम्पसाठी निवड

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

मुलींच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आरोग्यदायी पाऊल : हिमोग्लोबिन तपासणी