पोस्ट्स

सप्टेंबर २२, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उत्तम संवाद व लेखन या अर्जित कला- डॉ. महेश खरात

इमेज
संगमेश्वरमध्ये एकदिवसीय राज्यस्तरीय मराठी कार्यशाळा संपन्न, १३६ सहभागी  सोलापूर : २१ सप्टेंबर २०२६. कला या मानवी प्रतिभेचा आविष्कार असतात. त्यातून जीवनात आनंद निर्माण होतो. माणसाने भाषा घडवली. एकमेकांशी संवाद साधला. परंतु भाषा अस्तित्वात येण्याअगोदर मानव आपल्या कलेचा आविष्कार रंग, रेषा व विविध रेखाटनांच्या माध्यमातून करू लागला. हा त्याचा आत्माविष्कार होता. त्यामुळे कोणतीही कला उपजत नसते. ती शिकावी लागते. ती  प्रयत्न करून अर्जित करावी लागते. म्हणून उत्तम संवाद व लेखन या कलासुद्धा अभ्यास, सराव करून आत्मसात कराव्या लागतील असे विचार पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मानव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता व भाषा व वाङमय संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. महेश खरात यांनी व्यक्त केले. संगमेश्वर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने ‘मराठी संवाद आणि लेखन कौशल्ये’ या विषयावरील एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांची तर कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. राजकुमार मोहरकर यांची प्रमुख उपस्थिती...