पोस्ट्स

सप्टेंबर २४, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक

इमेज
 NCC कॅडेट्सनी घेतले आपत्कालीन परिस्थितीतील बचावकार्याचे धडे सोलापूर, दि. २४ सप्टेंबर २०२६ : संगमेश्वर कॉलेज, सोलापूर येथे आज आपत्ती व्यवस्थापनाबाबत विविध प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले. संगमेश्वर कॉलेजच्या NCC विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आपत्तीच्या काळात करावयाच्या उपाययोजना, बचावकार्य आणि प्रथमोपचार याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमामध्ये सीआयएसएफ चे अग्निशामन दलाचे इन्स्पेक्टर ए के मती , हेडकॉन्स्टेबल मयूर पाटील व कॉन्स्टेबल वाघ यांनी उपस्थित राहून विविध आपत्ती व्यवस्थापन व अग्निसुरक्षेची प्रात्यक्षिके करून दाखवली. आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता, प्रसंगावधान, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हा होता. विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींच्या प्रसंगी स्वतःचा बचाव करण्याबरोबरच इतरांना मदत कशी करावी, याचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी आगीच्या दुर्घटनेच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, बचावकार्य, प्रथम...