पोस्ट्स

ऑगस्ट २८, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

संगमेश्वर कॉलेजच्या क्रीडा परंपरेच्या प्रवासाचे आपण सहप्रवासी व्हा. - तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार

इमेज
   राष्ट्रीय क्रीडा दिन - हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा  जन्मदिन सोलापूर दिनांक - २९   ''संगमेश्वर कॉलेजला  वंदना शानबाग , गोपी मलपेद्दी, अनघा देशपांडे, कविता चिटिअप्पा यांच्यापासून ते आत्ताच्या ईशान मेरूपर्यंतच्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंची दैदिप्यमान परंपरा आहे. ही परंपरा सातत्यपूर्ण चालूच राहणार आहे.माझे एक आवाहन आहे  एक संगमेश्वर कॉलेजचा १९८७ चा माजी विद्यार्थी या नात्याने. या कॉलेजच्या या उज्ज्वल  क्रीडा परंपरेच्या प्रवासाचे आपण सारे विद्यार्थी  सहप्रवासी व्हा''. असे प्रतिपादन तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी केले. कॉलेजच्या वतीने हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.  व्यासपीठावर डॉ. ऋतुराज बुवा रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, जिमखाना विभागप्रमुख डॉ.आनंद चव्हाण, रात्र महाविद्यालय जिमखाना विभागप्रमुख शरण वांगी आदी उपस्थित होते.                    ...