८० वा स्वातंत्र्यदिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात
सोलापूर दिनांक १५ ८० वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम वंदे मातरम गीताचे गायन झाले . प्रारंभी मान्यवरांना ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या वतीने ध्वजावंदनासाठी निमंत्रित करण्यात आले. त्यानंतर प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर तिरंग्याला सलामी देण्यात आली. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र झाले. यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. प्राचार्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. नव्याने रुजू झालेल्या नाईन महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला .वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयात नव्याने रुजू झालेल्या प्राध्यापकांचा देखील यामध्ये सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे चित्रकला, महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, उपप्राचार्य प्रा.डॉ.राजकुमार मोहोरकर आदी उपस्थित होते. लेफ्टनंट तुकार...