पोस्ट्स

सप्टेंबर २३, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कर्मयोगी अप्पासाहेब यांची जयंती निमित आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न

इमेज
पारनेरचा आकाश प्रथम तर कोल्हापूरचा यश द्वितीय  सोलापूर दिनांक १५ - दैनिक संचार प्रबोधन मंच, कर्मयोगी कै. अप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्था आणि संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या  ११७ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२६ मध्ये  पारनेर जिल्हा अहमदनगर इथला आकाश दत्तात्रय मोहिते (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर, अहिल्यानगर ) हा प्रथम आला.तर  संकेत कृष्णा पाटील (न्यू कॉलेज कोल्हापूर ) द्वितीय आला. तृतीय क्रमांक पंडित दीनदयाल उपाध्याय कॉलेजची स्नेहल जोशी हिने पटकावला.उत्तेजनार्थ पुरस्कार  सानवी बिपिन वाळवेकर    ( श्राविका ज्युनियर कॉलेज, सोलापूर) सृष्टी चंद्रकांत सगरे ( वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स ) यांनी पटकावला.                 प्र.प्राचार्य प्रा.डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप प्रथम क्रमांक - ५००१ रुपये,द्वितीय क्रमा...

अभ्यासासोबत प्रभावी संवादातून उत्तम वक्तृत्व घडत जाते - सिद्धाराम पाटील

इमेज
संगमेश्वरमध्ये राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा  सोलापूर प्रतिनिधी, दिनांक  १५ - उत्तम वक्ता घडण्यासाठी केवळ अभ्यास पुरेसा नसतो; त्या ज्ञानाला प्रभावी संवादाची जोड मिळणे आवश्यक असते. जगप्रसिद्ध संशोधक निकोला टेस्ला यांनी आपल्या वैज्ञानिक विचारांची प्रभावी मांडणी करून जगाला नवे तंत्रज्ञान समजावून सांगितले. त्यामागची प्रेरणा स्वामी विवेकानंदांची होती. स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या धर्मपरिषदेत प्रभावी संवादातून भारतीय संस्कृतीची महानता जगासमोर मांडली.तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी ज्ञान, अनुभव आणि संवादकौशल्याच्या बळावर लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. त्यामुळे अभ्यासातून विचारसमृद्धी आणि संवादातून विचारांची प्रभावी अभिव्यक्ती होते. या दोन्हींच्या संगमातूनच आत्मविश्वासू आणि उत्तम वक्ता घडतो.परिणामी अभ्यासासोबत प्रभावी संवादातून उत्तम वक्तृत्व घडते. असे प्रतिपादन दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांनी केले. संगमेश्वर कॉलेजमध्ये कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घ...