पोस्ट्स

ऑक्टोबर १९, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
 नॅपकिन, टर्किश टॉवेलपासून आकर्षक गुच्छ तयार करण्याची कार्यशाळा  सोलापूर , दि. १२ ऑक्टोबर :   हातातील साध्या साहित्याला कल्पकतेची जोड देत आकर्षक कलाकृती साकारण्याचा आनंद वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला. नॅपकिन , बुके आणि टर्किश टॉवेलपासून सुबक व आकर्षक गुच्छ तयार करण्याच्या कार्यशाळेत इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. कौशल्यविकासासोबतच स्वयंरोजगाराच्या संधींची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवसमृद्ध ठरला. विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासोबतच त्यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधींची ओळख व्हावी , या उद्देशाने नॅपकिन , बुके आणि टर्किश टॉवेलपासून आकर्षक गुच्छ तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मार्गदर्शिका रश्मी शहा यांनी विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक गुच्छ तयार करण्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत विविध प्रकारचे सजावटीचे गुच्छ तयार करण्याचा आनंद...