संगमेश्वर कॉलेजच्या क्रीडा परंपरेच्या प्रवासाचे आपण सहप्रवासी व्हा. - तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार
राष्ट्रीय क्रीडा दिन - हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन
सोलापूर दिनांक - २९
''संगमेश्वर कॉलेजला वंदना शानबाग , गोपी मलपेद्दी, अनघा देशपांडे, कविता चिटिअप्पा यांच्यापासून ते आत्ताच्या ईशान मेरूपर्यंतच्या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारातील खेळाडूंची दैदिप्यमान परंपरा आहे. ही परंपरा सातत्यपूर्ण चालूच राहणार आहे.माझे एक आवाहन आहे एक संगमेश्वर कॉलेजचा १९८७ चा माजी विद्यार्थी या नात्याने. या कॉलेजच्या या उज्ज्वल क्रीडा परंपरेच्या प्रवासाचे आपण सारे विद्यार्थी सहप्रवासी व्हा''. असे प्रतिपादन तालुका क्रीडा अधिकारी गणेश पवार यांनी केले. कॉलेजच्या वतीने हॉकीचे महान जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अभिवादन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होते. व्यासपीठावर डॉ. ऋतुराज बुवा रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, जिमखाना विभागप्रमुख डॉ.आनंद चव्हाण, रात्र महाविद्यालय जिमखाना विभागप्रमुख शरण वांगी आदी उपस्थित होते.
प्रारंभी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिमखाना विभागप्रमुखांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला, त्यात त्यानी संगमेश्वर कॉलेजच्या क्रीडा परंपरेचा आढावा घेतला आणि सात वर्षे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या जनरल चॅम्पियनशिपचा मान आपल्या कॉलेजला मिळतोय याचा आनंद व्यक्त करत याचे सारे श्रेय आपल्या विद्यार्थ्यांना आहे असे त्यांनी सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचा परिचय संतोष खेंडे यांनी करून दिला. त्यानंतर पाहुण्यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने करण्यात आला . सत्कारानंतर प्रमुख पाहुण्यांनी दिलखुलास विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या 1987 सालापासून च्या जुन्या आठवणींना उजाळा देत,मेजर ध्यानचंद यांच्या योगदानाचा आणि कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातील करिअर विषयी अमोल मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन विक्रांत विभूते यांनी केले तर आभार शरण वांगी यांनी मानले. यावेळी प्रा.अनिता अलकुंटे, शिवराज पाटील, विश्वजीत आहेरकर, विशाल जत्ती, संतोष पवार वरिष्ठ आणि कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक आणि बीसीए, बीबीए विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.
.jpeg)



.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा