नॅपकिन, टर्किश टॉवेलपासून आकर्षक गुच्छ तयार करण्याची कार्यशाळा 

सोलापूर, दि. १२ ऑक्टोबर :  हातातील साध्या साहित्याला कल्पकतेची जोड देत आकर्षक कलाकृती साकारण्याचा आनंद वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी अनुभवला. नॅपकिन, बुके आणि टर्किश टॉवेलपासून सुबक व आकर्षक गुच्छ तयार करण्याच्या कार्यशाळेत इयत्ता अकरावीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या सर्जनशीलतेचे दर्शन घडवले. कौशल्यविकासासोबतच स्वयंरोजगाराच्या संधींची ओळख करून देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अनुभवसमृद्ध ठरला.

विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेला वाव देण्यासोबतच त्यांना स्वयंरोजगाराच्या नव्या संधींची ओळख व्हावी, या उद्देशाने नॅपकिन, बुके आणि टर्किश टॉवेलपासून आकर्षक गुच्छ तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या मार्गदर्शिका रश्मी शहा यांनी विद्यार्थ्यांना विविध साहित्यांचा कल्पकतेने वापर करून आकर्षक गुच्छ तयार करण्याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत विविध प्रकारचे सजावटीचे गुच्छ तयार करण्याचा आनंद अनुभवला.

अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळते. तसेच सर्जनशीलता, कौशल्यविकास आणि उद्योजकतेची आवड निर्माण होण्यास मदत होते. कमी साहित्याचा वापर करून आकर्षक वस्तू तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करण्याची संधी विद्यार्थ्यांना या कार्यशाळेतून मिळाली.या वेळी बाबासाहेब सगर,डॉ. रूपाली पाटील, मानसी जाधव आणि रक्षिता किशोरी उपस्थित होते.










                


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

'किताब और मैं' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

संधी, क्षमता आणि आवड यांचा समन्वय साधून करिअर घडवा – मनोज राऊत

विद्यार्थ्याने जाणून घेतला भारतीय हवामान विभाग