पोस्ट्स

भारताचा ७६ वा स्वातंत्र्यदिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात

इमेज
   भारतीय स्वातंत्र्यदिन चिरायू होवो ! सोलापूर प्रतिनिधी   भारताचा ७६  वा स्वातंत्र्यदिन  संगमेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा  झाला. सर्वप्रथम ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियन च्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर प्राचार्य राजेंद्र देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितांना प्राचार्यांनी  स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.  ध्वजारोहण कार्यक्रमानंतर नव्याने  सेवेत आलेल्या ९ महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या  जवानांचा  सत्कार करण्यात आला. याच कार्यक्रमात निवृत्त जवान आप्पासाहेब काळे आणि अण्णा निंबाळकर  यांचा सत्कार कॉलेजच्या वतीने करण्यात आला. महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागातील नवनियुक्त  अध्यापकांचे स्वागत करण्यात झाले. त्यानंतर स्वरदा मोहोळकर या विद्यार्थिनींने देशभक्तीपर गीते सादर केली.                           याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी ,रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे...

संपन्न आरोग्यासाठी प्राचीन आयुर्वेदातील ज्ञान जाणून घ्या - डॉ. संभाजी पाटील

इमेज
विज्ञान आणि आयुर्वेद या विषयावर संगमेश्वरमध्ये व्याख्यान सोलापूर ( दिनांक ११ ) ''   बदलत्या जीवनशैलीमुळे मानवाला आरोग्य कडे लक्ष द्यायला वेळ नाही अशी गतिमान परिस्थिती   निर्माण झाली आहे त्यामुळे जीवन व्याधीग्रस्त बनत चालले आहे संपन्न आरोग्यासाठी प्राचीन आयुर्वेदातील ज्ञान जाणून घ्या आणि त्याचा वापर करा वैज्ञानिक दृष्टीने   आयुर्वेदातील बारकावे जाणून घेतले तर जीवन संपन्न होईल '', असे मत डॉ. संभाजी पाटील यांनी व्यक्त केले. याप्रसंगी   उपप्राचार्य प्रसाद कुंटे , विज्ञान विभाग प्रमुख रामराव राठोड उपस्थित होते.                        प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर कॉलेजच्या वतीने वक्त्यांचा सत्कार करण्यात आला.    त्यानंतर त्यानी विद्यार्थ्यांशी दिलखुलास संवाद साधला ते पुढे म्हणाले की , ''   योग आणि आयुर्वेद यांचा अनन्यसाधारण संबंध आहे.   काळ काम आणि वेगाबरोबर आपण काम करत राहिलो तर निश्चितच आपण इच्छित ध्येय   गाठू शकतो. ...

पुस्तके जीवनाची पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात - संतोष कुलकर्णी

इमेज
    कॉलेजच्या  ' ग्रंथालय दर्शन ' उपक्रमातून दुर्मिळ ग्रंथांचा परिचय सोलापूर ( दिनांक 9 ) '' पुस्तके जीवन जगण्याची कला शिकवतात त्यामुळे ग्रंथालयातील वैविध्यपूर्ण पुस्तकांचं   वाचन करणे हे आपल्या महाविद्यालयीन जीवनामध्ये आद्य कर्तव्य माना .    साहित्य , कला , शिक्षण , विज्ञान , तंत्रज्ञान , संशोधन या क्षेत्रातील   अगाध ज्ञान जाणून   घेण्यासाठी वाचनाकडे वळले पाहिजे. समृद्ध ग्रंथालयातील   पुस्तके   जीवनाला दिशा देतात.   त्यातून वाचनाचा   समृद्ध संस्कार रुजतो वाढतो. व्यक्तिमत्त्व विकासात भर घालणाऱ्या आणि ज्ञानसंपन्न करणाऱ्या ग्रंथांकडे मार्गदर्शक म्हणून पहिले पाहिजे.   स्पर्धा परीक्षेच्या वातावरणात   ग्रंथ आपल्याला तत्कालीन    स्थलकालाची माहिती देतात. '' असा दिलखुलास संवाद मार्गदर्शक या नात्याने   सहाय्यक ग्रंथपाल संतोष कुलकर्णी साधत होते.   निमित्त होते   संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) कनिष्ठ विभाग हिंदी विभागाच्या वतीने   आयोजित केलेल्या ग...

विद्यार्थ्यांनी सादर केली सदाबहार 'पाऊसगाणी'

इमेज
संगमेश्वर कॉलेजच्या मराठी विभागाचा उपक्रम सोलापूर प्रतिनिधी  'श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे;  क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे.' या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे  ओळींप्रमाणे निसर्गाची  किमया पाहताना,अनुभवताना 'सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची, वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे' अशा सदाबहार पाऊस गाण्यांच्या सादरीकरणांनी विद्यार्थ्यांनी पावसावरील कवितांचा पाऊस पाडला. निमित्त होते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागात मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या पाऊसगाणी सादरीकरणाचे. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला विभागप्रमुख शिवशरण दुलंगे वाणिज्य विभागप्रमुख बसय्या हणमगाव यांची उपस्थिती होती.  प्रारंभीक तांत्रिक व सादरीकरणाच्या सूचना प्रा.संतोष पवार यांनी दिल्या. प्रा.अशोक निंबर्गी यांनी मराठी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या काव्यवाचन आणि सादरीकरण उपक्रमाची माहिती देत प्रास्ताविक केलं.उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी कविता सादर करत  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कला वाणिज...

संगमेश्वर कॉलेजमध्ये शहरस्तरीय क्रीडा शिक्षकांची सभा

इमेज
 जिल्हा क्रीडा कार्यालय व सोलापूर महानगरपालिका क्रीडा कार्यालय यांच्यावतीने शालेय शहर स्तरीय क्रीडा स्पर्धा बाबत क्रीडा शिक्षकांची सभा 170 क्रीडा शिक्षकांच्या उपस्थितीत संगमेश्वर कॉलेजमध्ये संपन्न झाली. या सभेला जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, सोलापूर मनपा क्रीडा अधिकारी एम. के .शहापुरे, संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य पी .एन. कुंटे ,त्याचप्रमाणे क्रीडा अधिकारी गणेश पवार, सत्येन जाधव, नदीम शेख, सुनील धारूरकर,तानाजी मोरे, सुप्रिया गाढवे, जयराज मुंडे, जिमखाना चेअरमन प्रा. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष दशरथ गुरव, शहराध्यक्ष विठ्ठल कुंभार उपस्थित होते.  याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार म्हणाले की, सोलापूरमध्ये 400 मीटर अथलेटिक्स सिंथेटिक मैदान, बॅडमिंटन हॉल त्याचप्रमाणे खेळाडूंसाठी चार मजली वस्तीगृह वाढवण्यात येणार , स्पर्धेसाठी येणाऱ्या पंचांच्या मानधनांमध्ये तीनशे रुपये करू,क्रीडा शिक्षकांसाठी कार्यशाळेचे , 100 क्रीडा शिक्षकांसाठी जिल्हा व तालुका प्रशिक्षनाचे आयोजन,स्पर्धेच्या ठिकाणी खेळाडूंसाठी पिण्याचे पाणी स्वच्छतागृह सुसज्ज मैदान करणे, सरत...