बारावा आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात
सोलापूर ( दिनांक २१ ) यंदाच्या २०२६ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य ' Yoga for Healthy Ageing ' निरोगी वृद्धत्वासाठी योग ' असे आहे. याला अनुसरून संगमेश्वर महाविद्यालय, रात्र विभाग आणि संगमेश्वर च्या विविध संस्थांच्या माध्यमातून योग प्रात्यक्षिकाचे आयोजन संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. यंदाचा बारावा योग दिन उत्साहात साजरा केला.
याकरता कॉलेजच्या जिमखाना विभागाने नियोजन केलं होतं. प्रारंभी प्रा.संतोष खेंडे यांनी प्रास्तविक केले. योगशिक्षक अजित कलागते यांनी योग प्रात्यक्षिकांच्या सूचना आणि निवेदन केले. त्यांच्यासोबत प्रा. शिवराज पाटील आणि कॉमर्स विभागाची विद्यार्थिनी स्नेहल जाधव हिने प्रात्यक्षिक केले. संगमेश्वर कॉलेज शिक्षण संकुलातील सर्व शिक्षक, कर्मचारी बांधवानी प्रशिक्षकासोबत प्रात्यक्षिके केली.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे,कनिष्ठ विभाग पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांच्यासह जिमखाना विभागाचे प्रा.शरण वांगी, विक्रांत विभुते यांच्यासह प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी उपस्थितांना प्रोत्साहन देत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले '' योग ही भारताने जगाला दिलेली एक अमूल्य देणगी आहे. योग केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांना एकत्र जोडणारी जीवनशैली आहे.
आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव, चिंता आणि विविध आजार वाढत आहेत. अशा वेळी नियमित योगाभ्यास केल्याने शरीर सुदृढ राहते, मन शांत राहते आणि जीवनात सकारात्मकता निर्माण होते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकासाठी योग उपयुक्त आहे.
नियमित योग केल्याने आयुष्य अधिक निरोगी, आनंदी आणि उत्साही बनते.चला, आपण सर्वजण दररोज काही वेळ योगासाठी देण्याचा संकल्प करूया आणि निरोगी भारताच्या निर्मितीत आपला सहभाग नोंदवूया.'' हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.




.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा