'किताब और मैं' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
ग्रंथालय आणि हिंदी विभागाचा विद्यार्थीकेंद्री उपक्रम
सोलापूर दिनांक २०
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड
निर्माण व्हावी व्यक्तिमत्व विकासनाचे धडे त्यांना मिळावेत. सतत संगणक आणि
मोबाईलची सोबत करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयात यावे. आपल्या आवडीची पुस्तके
निवडावीत. कथा, कादंबरी, कवितांसोबत वर्तमानपत्रांचे अवांतर वाचन करावे. ग्रंथांचे आणि
ग्रंथालयाचे महत्व जाणावे. या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन संगमेश्वर कॉलेज
कनिष्ठ हिंदी विभाग आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने करण्यात. या प्रसंगी ग्रंथपाल
डॉ. विजयकुमार मुलींनी पर्यवेक्षक डॉ.मल्लिनाथ
साखरे, सहाय्यक ग्रंथपाल,भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी,सहायक
ग्रंथपाल संतोष कुलकर्णी, प्रा. शिवराज पाटील, गणेश
फंड, आदी उपस्थित होते.
प्रारंभी नियती चांगले यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ग्रंथपूजन झाले. अतिथी परिचय अंजुश्री माढेकर यांनी करून दिला. ग्रंथपाल डॉ. विजय मुलीमनी यांनी ग्रंथालय कामकाज आणि ग्रंथांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यानंतर पर्यवेक्षक डॉ.साखरे यांनी उपक्रमाचे कौतुक करत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले. वाचन केलेल्या पुस्तकात किताब और मैं या सेल्फी पॉइंट वरून छायाचित्र घेण्यात आले. आवडीच्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांनी सेल्फी घेतल्या आणि वाचन पूर्ण झाल्यानंतर पुस्तकाचा परिचय करून देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री बुद्धीने हिने केले तर आभार प्रदर्शन आकांक्षा इंगळे यांनी मांडले.या प्रसंगी शिवशरण दुलंगे,संतोष पवार,श्रीशैलप्पा हुंडेकरी डॉ.रेवप्पा कोळी,राजकुमार घुगे,संजय कुंभार,आनंद बनसोडे आदी उपस्थित होते.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा