कर्मयोगी अप्पासाहेब यांची जयंती निमित आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न
पारनेरचा आकाश प्रथम तर कोल्हापूरचा यश द्वितीय
सोलापूर दिनांक १५ - दैनिक संचार प्रबोधन मंच, कर्मयोगी कै. अप्पासाहेब काडादी नागरी सहकारी पतसंस्था आणि संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा २०२६ मध्ये पारनेर जिल्हा अहमदनगर इथला आकाश दत्तात्रय मोहिते (न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर, अहिल्यानगर ) हा प्रथम आला.तर संकेत कृष्णा पाटील (न्यू कॉलेज कोल्हापूर ) द्वितीय आला. तृतीय क्रमांक पंडित दीनदयाल उपाध्याय कॉलेजची स्नेहल जोशी हिने पटकावला.उत्तेजनार्थ पुरस्कार सानवी बिपिन वाळवेकर ( श्राविका ज्युनियर कॉलेज, सोलापूर) सृष्टी चंद्रकांत सगरे ( वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स ) यांनी पटकावला.
प्र.प्राचार्य प्रा.डॉ.ऋतुराज बुवा यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.पुरस्काराचे स्वरूप प्रथम क्रमांक - ५००१ रुपये,द्वितीय क्रमांक – ३००१ रुपये, तृतीय क्रमांक – २००१ रुपये उत्तेजनार्थ एक प्रशस्तिपत्रक असे होते.आकाशवाणी सोलापूरचे निवृत्त निवेदक अभिराम सराफ आणि रात्र महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.सोनाली गिरी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. दत्तात्रय गुड्डेवाडी यांनी यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.या प्रसंगी कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
सकाळच्या सत्रात दैनिक सकाळचे सहयोगी संपादक सिद्धाराम पाटील यांच्या उपस्थितीत उद्घाटन सत्र झाले.या सत्रात त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास आणि वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी निर्माण करावी लागणारी दूरदृष्टी या विषयावर दिलखुलास भाष्य केले.प्र.प्राचार्य प्रा.डॉ.ऋतुराज बुवा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कर्मयोगी अप्पासाहेबांच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासूनच्या कार्याचा आणि तत्कालीन घटनांचा मागोवा घेत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. समन्वयक प्रा.डॉ.सुहास दहिटणेकर यांच्यासह प्रा.डॉ.शीला रामपुरे ,प्रा.डॉ. मंजू संगेपाग,शिवराज पाटील,सायबण्णा निम्बर्गी, संतोष पवार,प्रा.प्रवीण राजगुरू प्रा.डॉ. विलास पाटील, संयोजन समितीतील सदस्यांनी परिश्रम घेतले.




.jpeg)



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा