पोस्ट्स

संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा

इमेज
  संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा सोलापूर प्रतिनिधी- “ आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मिळालेले नॉलेज वाढवा. जो अभ्यास कराल , संशोधन कराल त्याचे पेटंट मिळवायचा प्रयत्न करा आणि महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवा." असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी केले.संगमेश्वर कॉलेजमधील व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स विभाग व फिजिक्स (ज्यु.) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "हँड्स ऑन रोबोटिक्स" या विषयावरील कार्यशाळेच्या   उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे  ,  पर्यवेक्षक मल्लिनाथ  साखरे, भौतिक शाश्त्र विभागप्रमुख  डॉ.शुभांगी    गावंडे , तज्ञ मार्गदर्शक डॉ. बचुवार , डॉ.जोगदे उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. शुभदा  कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन प्रा. प्रियंका पाटील यांनी केले. तर आभार प्रा.चंद्रकांत हिरतोट यांनी मानले.या प्रसंगी प्रा.प्रशांत शिंपी , प्रा.बाळकृष्ण कापसे ,  प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर ,  प्रा.नागेश कोल्हे...

नीट परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून शशिधर नामतुरे प्रथम

इमेज
 नीट परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून शशिधर नामतुरे प्रथम  सोलापूर प्रतिनिधी :   एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परीक्षेत संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले निकाल याप्रमाणे - शशिधर नामतुरे ५२९(प्रथम), शिफा सवार ४९९(द्वितीय) , प्रियांशु रंजन ४८३(तृतीय) , गौतमी बनसोडे ४५१, संहिता वठारे ३७७, मानसी पाटील ३६७, ओंकार शीशेट्टी ३४४, शकुंतला कलशेट्टी, समर्थ अक्कलकोटे, ऐश्वर्या बिराजदार, सुखदा मालखरे, मुन्सिफा नदाफ, तेजस आयवळे, स्नेहल भालेराव, इशा काझी , मुजम्मिल कादरी, गणेश सकट. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , उपप्राचार्य श्री. प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक श्री मल्लिनाथ साखरे, विज्ञान शाखा समन्वयक श्री. रामराव राठोड सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.कॉलेजच्या वतीने  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी बाळकृष्ण कापसे ,सुषमा पाटील, विशाल जत्ती, सिद्धाराम विजापूरे, डॉ.गणेश मुडेगावकर, संतोष पवारआदी उपस्थित होते. लीना खमितकर सूत्...

एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून संचिता वठारे, नंदिनी सुत्रावे अव्वल स्थानावर

इमेज
  एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून संचिता वठारे, नंदिनी सुत्रावे अव्वल स्थानावर  सोलापूर ( प्रतिनिधी )    महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल काल १२ जूनला जाहीर करण्यात आला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) ग्रुप्ससाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रेन्स टेस्ट २०२३ चा निकाल घोषीत करण्यात आला. यामध्ये  संगमेश्वर कॉलेजमधून संचिता चंद्रशेखर वठारे ( ९८.०० पर्सेन्टाइल ),नंदिनी नागेश  सुत्रावे ( ९९.६०  पर्सेन्टाइल ) अव्वल स्थानावर राहिले. पर्सेन्टाइलनुसार निकाल - ( PCB ) शकुंतला संतोष कलशेट्टी ९५.६, ओमकार महादेव शिवशेट्टी ९५,मोहम्मद कैफ इब्राहिम बिराजदार ९०.८७,ऐश्वर्या सिद्धाराम बिराजदार ८९ .८१,गणेश शशिकांत सकट ८८.६,शगुन संजय राठोड ८८.१७,निकिता गुरुशांत हावशट्टी ८७.४५,वैष्णवी अजित जाधव ८६.११,प्रिया विनायक परदेशी ८५.५३, विश्वजीत अतुल कोथिंबीर ८५.३८. पर्सेन्टाइलनुसार (PCM) - देवांग नितीन देशपांडे ९८.६९, विद्याराणी पृथ्वीराज देशमुख ९८.५,सलोनी पुष्पराज सिंग बायस ९८....

बारावीत संगमेश्वर कॉलेजचा निकाल ९१.९७ टक्के

इमेज
  बारावीत संगमेश्वर कॉलेजचा निकाल  ९१.९७ टक्के सोलापूर दिनांक ( २५ मे   २०२३ ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज , सोलापूरचा बारावीचा निकाल   ९१ .९७    टक्के इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे   - विज्ञान शाखा - ९८.४२ , वाणिज्य शाखा - ९४.२० , कला शाखा -   ७७.९७ टक्के इतका लागला . विज्ञान व कला शाखेत मुलींनी बाजी मारली.तर वाणिज्य शाखेचा राघव विशाल बन्सल (प्रथम ९३.३३) हा विद्यार्थी कॉलेजमधून तिन्ही शाखांमधून प्रथम आला. यशस्वी विद्यार्थी-   विज्ञान शाखेतून - नंदिनी नागेश सुत्रावे ( प्रथम   ८९.००) सलोनी पुषपराजसिंह बायस ( द्वितीय ८७.००) सुहानी ऋषिकेश शाह   (तृतीय ८६.५०) तर वाणिज्य शाखेतून - राघव विशाल बन्सल (प्रथम ९३.३३) वरद विजय जोशी   (द्वितीय ९३.००)समर्थ प्रसन्न स्वामी ( तृतीय ९२.१७) कला शाखेतून   - प्रीती महादेव कोरी ( प्रथम ८९.६७   ) रोहित नारायणारं सुतार ( द्वितीय ८९.५०   ) साक्षी चंद्रकांत करपे ( तृतीय ८८.१७)             या वि...

महाराष्ट्र दिन व कामगार दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात.

इमेज
सोलापूर प्रतिनिधी ( दिनांक १ मे २०२३ ) महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस,  संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त ) मध्ये मोठ्या उत्साहात साजरा  साजरा झाला. प्रारंभी मान्यवरांचे मैदानावर आगमन झाले.त्यानंतर तिरंग्याला मानवंदना देण्यात आली.  प्राचार्य राजेंद्र देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. उपस्थितांना प्राचार्यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची राज्याची निर्मिती झालेली आहे. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. हा दिवस मराठी माणसाचा आहे आणि ते मोठ्या उत्साहाने साजरा करतात, विविध कार्यक्रमांचे आयोजनही या दिवशी केले जाते. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. याप्रसंगी उपप्राचार्य वंदना पुरोहित, डी.एम. मेत्री, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास गोठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.मेजर चंद्रकांत हिरतोट यांनी सूत्रसंचालन केले.

संगमेश्वर नाईट कॉलेजमध्ये जीएसटी प्रणालीवर यावर व्याख्यान

इमेज
  उद्योग, व्यवसायात वस्तू व सेवा कर ही बाब महत्त्वाची आहे                                                        डॉ.बाळासाहेब मालेगावकर  संगमेश्वर नाईट कॉलेजमध्ये जीएसटी प्रणालीवर यावर व्याख्यान  सोलापूर दिनांक 25 '' कोणत्याही उद्योगात व्यवसायात आर्थिक नियोजन करतो त्यासोबत असलेल्या वस्तू व सेवा कराची प्रक्रिया ही महत्त्वाची बाब आहे. उत्पादित वस्तू ग्राहक केंद्र बनवताना जीएसटी सोबत मूल्यांकन करावे लागते. असे प्रतिपादन डॉ.बाळासाहेब मालेगावकर ( राज्यकर उपायुक्त, वस्तू व  सेवा कर, सोलापूर)  यांनी केले ते संगमेश्वर रात्र महाविद्यालय वाणिज्य विभाग आयोजित व्याख्यानात जीएसटी प्रणालीवर बोलत होते. याप्रसंगी  प्राचार्य एस.डी.गोठे  ,डॉ.व्ही. सी.अचकनळी आदी उपस्थित होते.            प्रा.घनाते  यांनी प्रास्ताविक केलं. परिचय प्रा.आर.एस. कोळी करून दिला. जीएसटीचे फायदे, त्याची वैशिष्ट्ये, याद्वारे ...

'आला उन्हाळा, तब्येत सांभाळा' - संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांचे प्रबोधन

इमेज
संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखेचा उपक्रम  सोलापूर ( दिनांक १९ एप्रिल )  '' वाढत्या उन्हाच्या तीव्रतेचा धोका ओळखून तापमानाचा पारा सध्या राज्यभर ४० च्या वरती जात असल्याने संगमेश्वर कॉलेज स्वायत्त कनिष्ठ विभाग कला शाखेच्या वतीने प्रबोधन करत उन्हाळ्यात काळजी घेण्यासाठी टोपी वापरा, पुरेसे पाणी प्या, पाण्याची बाटली जवळ ठेवा  अश्या आशयाचे  फलक दर्शवून प्रबोधन केले. 'आला उन्हाळा, तब्येत सांभाळा ' अशा घोषणा  दिल्या. यामध्ये समृद्धी सावंत , नेहा अय्यर, हेमंत नक्का, आकांक्षा पाठक, श्रेयसी कुंटे,राजश्री बन्ने  यांच्यासह कला शाखेतील विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधला.                              याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र देसाई, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, समन्वयक शिवशरण दुलंगे, प्रा.अशोक निम्बर्गी प्रा.शहाजी माने, प्रा.शिवराज पाटील, प्रा. एस. बी. निम्बर्गी, प्रा. डॉ.विठ्ठल अरबाळे, प्रा.  शंकर कोमुलवार ,प्रा. दत्तात्रय गुड्डेवाडी, प्रा. विश्वनाथ कक्कळमेली, प्रा.कोमल कोंडा, प्रा.र...