पोस्ट्स

निरोगी जीवनाचा मूलमंत्र म्हणजे -संतुलित आहार -अंजली ठोंबरे

इमेज
आहार आणि निरामय जीवन या विषयावर  डायट वेळापूर  संगमेश्वरच्या शिक्षक प्रशिक्षणात व्याख्यान   सोलापूर दिनांक 20 प्रतिनिधी-  ''आहार हा निरोगी जीवनाचा मूलभूत आधार आहे. संतुलित आहार घेतल्यास शरीर सुदृढ राहते आणि अनेक रोग टाळता येतात. आयुर्वेद, आधुनिक पोषणशास्त्र आणि पारंपरिक ज्ञान यांचा संगम साधून योग्य आहार घेणे आवश्यक आहे.संतुलित आहार म्हणजे शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतील असा आहार. यामध्ये प्रथिने, कर्बोदकं, स्निग्ध पदार्थ (फॅट्स), जीवनसत्त्वे (व्हिटॅमिन्स) आणि खनिजे (मिनरल्स) यांचा समावेश असतो. याचा आपण संतुलित विचार करून व्यवस्थित नियोजन करावे.''  असे प्रतिपादन वेलनेस मास्टर क्लासच्या संचालिका ,आहार आणि निरामय जीवनशैलीतज्ञ अंजली ठोंबरे यांनी केले. त्या आहार आणि निरामय जीवन  या विषयावर आयोजित संवाद सत्रात   बोलत होत्या. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे डायटचे प्रा. प्रभाकर बुधाराम उपस्थित होते.  त्यापुढे म्हणाल्या की '' नैसर्गिक व ताज्या पदार्थांचा समावेश करा. प्रक्रियायुक्त अन्न टाळा.मितभोजनाचा (योग्य प्रमाण...

संगमेश्वर हे संस्काराचे विद्यापीठ

इमेज
   वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात रविमुकुल यांचे प्रतिपादन  सोलापूर,  संगमेश्वर महाविद्यालय हे केवळ क्रमिक अभ्यासक्रम शिकवणारी शैक्षणिक संस्था नसून संस्काराचे विद्यापीठ असल्याचे सांगतानाच ज्ञान सर्वत्र असून विद्यार्थ्यांनी आपली ओंजळ खुली ठेऊन ज्ञानार्जन करावे असे प्रतिपादन ख्यातनाम चित्रकार आणि लेखक रविमुकुल यांनी केले. सोलापूरातील पहिली स्वायत्त संस्था ठरण्याचा मान मिळवलेल्या संगमेश्वर महाविद्यालयात 72 वा वार्षिक शैक्षणिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी जल्लोषात पार पडला. या सोहळ्यात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि पुस्तकांच्या मुखपृष्ट रेखाटनात प्रसिध्द असलेले रविमुकूल बोलत होते. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. धनंजय माने, श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, अ‍ॅड. रा. गो. म्हेत्रस, शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य एस. डी. गोटे, उपप्राचार्य प्रसाद...

विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवून ध्येय गाठावे - डॉ. अतुल लकडे

इमेज
 संगमेश्वरचा ७२ वा वार्षिक क्रीडा गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संचार प्रतिनिधी-  सोलापूर, दि. १५ आजच्या स्पर्धेच्या युगात दैदिप्यमान यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यामधील क्षमतांचा शोध घेवून त्यावर परीश्रम करुन ध्येय गाठावे. क्रीडा ही केवळ स्पर्धा नसून ती शिस्त, समर्पण व आत्मविकासाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशाकडे लक्ष न देता शारीरीक व मानसिक तंदुरुस्तीवरही लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे क्रीडा संचालक प्रा.डॉ. अतुल लकडे यांनी केले. शनिवारी, संगमेश्वर कॉलेजमध्ये ७२ व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य अण्णाराज काडादी हे होते. तसेच संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष  सी. वी. नाडगौडा, शैक्षणिक सल्लागार प्रा. प्रमोद दर्गापाटील, उपप्राचार्य प्रा. पी. एन. कुंटे, संगमेश्वर रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. गोठे, कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकल...

विद्यापीठ आयोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत 'संगमेश्वर'चे घवघवीत यश :

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील संगणकशास्त्र संकुलाच्यावतीने  राष्ट्रीय स्तरावरील (National Level) डेक्स्टर इनोफेस्ट ( Dexter Innofest) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विविध विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा प्रोग्रॅम कॉम्पिटिशन (program competition), पेपर प्रेझेंटेशन (paper presentation),  आणि पोस्टर कॉम्पिटिशन ( poster competition) या प्रकारात पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर घेण्यात आली होती. या स्पर्धेत संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना संगणकशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल संस्थेच्या चेअरमन मा. धर्मराज काडादी, सचिव प्रा.ज्योती काडादी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य ऋतुराज बुवा, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. राजश्री हुंडेकरी व इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक केले. चौकट ऋचा साळुंखे   BSc ECS-II प्रोग्राम कॉम्पिटिशन - प्रथम क्रमांक  उदयग गाजूल  MSc CS-II  पेपर प्रेझेंटेशन -...

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज आणि कर्मयोगी अप्पासाहेब यांना अभिवादन

इमेज
  मराठी भाषा गौरव दिन ... मराठीची थोरवी ही अनन्यसाधारण आहे                                                                            --कवी माधव पवार  सोलापूर प्रतिनिधी -    ''मराठी ही पुरातन भाषा आहे.मराठीची थोरवी ही अनन्यसाधारण आहे. तिच्या संवर्धनासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. कथा, कविता , कादंबरी या सोबतच आपणही लिहिते झालो. तर निश्चितच मराठीचा मोठेपणा सर्वदूर जाईल असा विश्वास वाटतो. म्हणून महाविद्यालयीन जीवनात भित्तिपत्रकासारखे उपक्रम अतिशय उपयोगी असतात. भाषिक कौशल्य वाढीस लागण्यासाठी भाषेची गोडी लागण्यासाठी असे उपक्रम नक्कीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात भर घालतील असा विश्वास वाटतो. '' असे प्रतिपादन जेष्ठ कवी माधव पवार यांनी केले. ते संगमेश्वर कॉलेज मराठी विभाग आयोजित मराठी भाषा गौरव दिन, कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज जयंती आणि कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या स्मृतिद...