पोस्ट्स

जागतिक चॉकलेट दिनानिमित्त ‘ मेक अँड ट्रेड ’ व पोस्टर सादरीकरण स्पर्धा

इमेज
सोलापूर प्रतिनिधी-  जागतिक चॉकलेट दिनानिमित्त संगमेश्वर महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे ‘मेक अँड ट्रेड’ आणि ‘पोस्टर प्रेसेंटेशन’ या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य आणि सर्जनशीलता वृद्धिंगत व्हावी, यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ‘भकालो फ्रुट्स, सोलापूर’चे संचालक श्री. धीरेनबाई गडा यांच्या हस्ते संपन्न झाले. प्रमुख उपस्थितीत श्री. वर्धिनी संस्थेचे चन्नवीर बंकुर व पार्थ तेरकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आर. पी. बुवा, उपप्राचार्य डॉ. वी. के. पुरोहित, तसेच वाणिज्य मंडळ समन्वयक डॉ. आर. एम. खिलारे यांचा समावेश होता. यावेळी प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  धीरेनबाई गडा यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशील उपक्रमांचे आणि चॉकलेट निर्मितीतील नवकल्पनांचे कौतुक करत महाविद्यालयाच्या उपक्रमशीलतेचे अभिनंदन केले. ‘मेक अँड ट्रेड’ स्पर्धेसाठी 20 संघ सहभागी झाले, तर ‘पोस्टर प्रेसेंटेशन’साठी 30 संघ सहभागी झाले. एकूण 140 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ‘मेक अँड ट्रेड’ मध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः...

अमली पदार्थांचे दुष्परिणाम भयानक,तरुणांनो सावधगिरी बाळगा --- राजन माने

इमेज
संगमेश्वर कॉलेजच्या प्रबोधन कट्ट्याच्या वतीने जनजागृती  अमली पदार्थ विरोधी दिन - १९८७ मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने (UN) हा दिवस जाहीर केला.यामागील उद्दिष्ट समजावूनघेतल्यावर लक्षात येते की,अमली पदार्थांच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवणे.बेकायदेशीर तस्करी थांबवणे.व्यसनमुक्त समाजाची जाणीव निर्माण करणे.या बाबी महत्वाच्या आहेत.त्यासाठी युवकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे  – कारण व्यसनाचे सर्वात जास्त प्रमाण तरुणांमध्ये आढळते.शारीरिक व मानसिक आरोग्याचे रक्षण व्हावे,गुन्हेगारी आणि समाज विघातक क्रियाकलापांपासून युवक लांब गेला पाहिजे . वैयक्तिक व कौटुंबिक जीवनात सुधारणा व्हावी यासाठी प्रबोधन गरजेचे आहे. त्यासाठी भारतभर व्याख्याने, रॅली, पोस्टर स्पर्धा, शपथ विधी,व्यसनमुक्तीविषयी माहितीपट दाखवणे ,पुनर्वसन केंद्रांची मदत व माहिती देणे असे उपक्रम घेतला जातात. त्यांचाच एक भाग म्हणून  संगमेश्वर कॉलेज सोलापूर कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी राबवला जाणाऱ्या उपक्रमामध्येआज सोमवार २१  जुलै रोजी अमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम सात रस्ता परि...

संगमेश्वर कॉलेज एनसीसी कॅडेट्सची यशस्वी परंपरा कायम

इमेज
सोलापूर प्रतिनिधी  - महाराष्ट्र बटालियन एनसीसी सोलापूर आयोजित सीएटीसी ७०३ व सीएसटीसी ७०४ असे दोन एनसीसी कॅम्प सहस्रार्जुन प्रशाला येथे घेण्यात आले होते. या कॅम्पमधील विविध स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या एनसीसी कॅडेट्सने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यामधील कॅम्पचे प्रतिनिधित्व इरफान तांबोळी, प्रियंका राठोड, दर्शन चिंचोळकर, सौंदर्या पुजारी यांनी केले.               या एनसीसी शिबिरामध्ये मुलांसाठी व्हॉलिबॉल, रस्सीखेच, खो-खो या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुलांमध्ये (हॉलिबॉल) संगमेश्वर कॉलेजमधील एनसीसी कॅडेट्सना प्रथम क्रमांक मिळाला, तर रस्सीखेच या स्पर्धेमध्ये मुलींमधून संगमेश्वर कॉलेजला प्रथम क्रमांक मिळाला आहे. तसेच खो-खो या स्पर्धे त मुलींमधून संगमेश्वर कॉलेजला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. वैयक्तिक प्रकारामध्ये रायफल शूटिंग स्पर्धेत विवेक पानीभाते प्रथम क्रमांक पटकावला तर मुलींमधून अक्षता धर्मे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या कॅम्पमधून बेस्ट वॉलेंटियर कॅडेट म्हणून कल्याणी नागठाण या कॅडेटची निवड करण्यात आली. तसेच याच कॅम्पमधून पुढील थलसेना कॅ...

आंतरराष्ट्रीय योग दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये उत्साहात

इमेज
सोलापूर ( दिनांक २१ ) यंदाच्या २०२५ च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे घोषवाक्य ' एक पृथ्वी, एक आरोग्य ' (One Earth, One Health) असे आहे. याचा अर्थ असा की, योगाच्या माध्यमातून संपूर्ण पृथ्वीला आणि लोकांना निरोगी बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे, असे PIB ने म्हटले आहे.  याला अनुसरून संगमेश्वर महाविद्यालय, रात्र विभाग आणि संगमेश्वर च्या विविध संस्थांच्या माध्यमातून योग प्रात्यक्षिकाचे आयोजन संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आलं होतं. यंदाच्या योग दिन उत्साहात साजरा केला. याकरता कॉलेजच्या जिमखाना विभागाने नियोजन केलं होतं. प्रारंभी प्रा. शरण वांगी यांनी योददिनाचे महत्व विशद केले. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांनी उपस्थित रीदमॅटिक योगाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले.विद्यार्थ्यांना  शुभेच्छा दिल्या. त्यानंतर योगाचा  प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने पुढच्या महिन्यापासून योगाच्या स्पर्धा शहर आणि परिसरात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर योग गुरु स्नेहल पेंडसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले यातून त्यांनी योग जीवनासाठी कसा आवश्यक आहे, हे अधोरेखित केले.त्यांनतर प्रात्यक्षिकास प्रारंभ...

एमएचटी - सीइटी परीक्षेत विद्यार्थ्यांचे संगमेश्वर कॉलेजचे यश

इमेज
सोलापूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (MHT-CET) परीक्षेचा निकाल नुकताच लागला.यामध्ये संगमेश्वर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले. सायली सुनील पाटील या  विद्यार्थिनीने ९७.१५ परसेंटाइल  घेऊन या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला, तर अथर्व लिंगराज मरगूर  याने ९६.८२ परसेंटाइल  घेऊन दुसरा येण्याचा मान मिळवला. ओंकार सुहास वाघमोडे यांनी ९५.६७ परसेंटाइल घेऊन तिसरा येण्याचा मान मिळवला. निकाल याप्रमाणे -  शिवेन हलकुडे (९५ ), चैतन्य सतीश भोसले ( ९४.३४),  साई देविदास कांबळे (९२.३८ ), सुवर्णा गणपत हलनुरे ( ९०.३), वैभव संजय पाटील (९०.२५),  राधा सचिन चटके ( ८९.८२ ), अमोल रविकांत उपासे (९७ ), महेश साक्षी चिनगुंडे (८५.८४),  युवराज साळुंखे (८५.४१) ,आदिती चोपडे (८५.१९,) प्रथमेश अणवेकर ( ८५ ), अक्षता अलकुंटे ( ८४ ), समीक्षा तेली ( ८४) अथर्व वाले (८२.६५), निमीश उपासे (८२.५ ), श्रुती घुले ( ८२ ),  ऋषीराज माने (८२ )  सानिया मुजावर ( ८१.९७ )  गंगाधर उडासे (८१.८७), ओम माने ( ८१.६३) , अनिकेत पारवे ( ८१ ),  वैभवी पाटील ( ...

संगमेश्वर कॉलेजचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के

इमेज
कला शाखा ६९.९०,वाणिज्य ९२.७६, विज्ञान ९७.४० वाणिज्य शाखेचा ईशान मेरू कॉलेजमधून सर्वप्रथम सोलापूर प्रतिनिधी -  दिनांक ( ५ मे  ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज ,सोलापूरचा बारावीचा निकाल ८९.२२ टक्के  इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे  -  कला शाखा ६९.९० वाणिज्य ९२.७६ विज्ञान ९७.४० टक्के इतका लागला.वाणिज्य शाखेचा ईशान वैभव मेरू ( ९४.१७)   कॉलेजमधून सर्वप्रथम तर कला विभागातून -  ऋग्वेद राहुल देशमुख ८८.६७  टक्के घेऊन प्रथम आला.विज्ञान शाखेतून ओंकार सुहास वाघमोडे  ८३.६७  याने  प्रथम येण्याचा मान मिळवला. निकाल याप्रमाणे -  वाणिज्य शाखा -  प्रथम - ईशान वैभव मेरू ( ९४.१७) द्वितीय - तनिष्का मनीष माने  ( ९१.३०) तृतीय - श्वेता दिलीप कत्ते ( ८९.५० )  कला शाखा   -  ऋग्वेद राहुल देशमुख ८८.६७  सृष्टी  नंदकुमार इनामदार ८८.५० रश्मी सुरज फत्तेवाले ८५.०० विज्ञान  शाखा  - प्रथम - ओंकार सुहास वाघमोडे (८३.६७ ) द्वितीय - सायली सुनील पाटील (८३.१७)  तृतीय - अथर्व लिंगराज मरगुर...

६६ वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये साजरा

इमेज
 सोलापूर (दिनांक १  मे २०२५ )  ६६  वा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला.याप्रसंगी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. श्रीनिवास गोठे, उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी ,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य  प्रा. प्रसाद कुंटे, आदी मान्यवर उपस्थित होते.  प्र.प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.राष्ट्रगीतानंतर ' भारत माता की जय ' ही सलामी देण्यात आली. त्यानंतर प्राचार्यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व विभागातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी  उपस्थित होते.