शासकीय कामकाजात भाषेतील अचूकतेला महत्त्व आहे - निवृत्त सहा.पोलीस आयुक्त दीपकआर्वे
संगमेश्वर कॉलेज ( स्वायत्त ) कनिष्ठ विभागात
मार्गदर्शन
सोलापूर ( दिनांक १९ ऑगस्ट ) ''आपल्या महाविद्यालयीन जीवनातील विविध भाषांचा अभ्यास करताना लेखन कौशल्य आपण
आत्मसात केली पाहिजेत. जाणीवपूर्वक
भाषेचे व्याकरण आपण शिकलो तर नक्कीच क्षेत्र कोणतेही असो प्रशासकीय पातळीवर आपण
उत्तम आणि लोकाभिमुख काम करू शकतो.'' असे मार्गदर्शन निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपकआर्वे यांनी
केले. ते संगमेश्वर कॉलेजच्या वतीने
आयोजित केलेल्या शासकीय कामकाजातील
भाषेचे महत्त्व या विषयावर या व्याख्यानात बोलत होते. याप्रसंगी
व्यासपीठावर प्राचार्य डॉ.
राजेंद्र देसाई उपस्थित होते.
संस्कृतचे प्रदीपआर्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यानंतर स्नेहा शहा हिने हिंदी भाषेचे महत्त्व सांगत आपले मनोगत व्यक्त केले. कॉलेजच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी दिलखुलास मार्गदर्शन केले. शासकीय कामकाजातील टिपण्यांना किती महत्त्व आहे आणि अचूकता आणि नेमकेपणा याचा वापर व्यवस्थित झाला तर प्रशासनात नेमकेपणा कसा येतो ? हे पोलीस प्रशासनातील अनेकविध अनुभव सांगत त्यांनी सांगितले.
आपले अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावरील
वेगवेगळ्या भाषेचे अध्यापन करताना मुलांना भाषिक कौशल्याकडे वळवणे हे महत्त्वाचे असल्याने असे उपक्रम आम्ही
महाविद्यालयीन स्तरावर राबवत असतो
त्यामुळे वेगवेगळ्या भाषांची त्यातील लेखन कौशल्यांची ओळख होते असे सांगितले. अवनी आहुजा हिने सूत्रसंचालन
केले तर श्रेयसी कुंटे हिने जर्मन भाषेत सर्वांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा