पोस्ट्स

मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शब्दविणा' भित्तीपत्रकाचे उद्घाटन

इमेज
 मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये  ' शब्दविणा '  भित्तीपत्रकाचे  उद्घाटन  सोलापूर दिनांक १६  मराठी भाषा पंधरवड्या निमित्त संगमेश्वर कॉलेजमध्ये 'शब्दविणा' या भितीपत्रकाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या हस्ते झाले.याप्रसंगीउपप्राचार्य डी. एम. मेत्री ,मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.सुहास पुजारी, डॉ.महादेव देशमुख,  हिंदी विभाग प्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे,   सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. दादासाहेब खांडेकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख डॉ. साखरे,    भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहोरकर  ,  डॉ. मकानदार आदी मान्यवर उपस्थित होते.                                           प्रारंभी भित्तीपत्रक तयार करण्यामागचा उद्देश विभागप्रमुखांनी सांगितला.  त्यात ते म्हणाले की,'' मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे. मातृभाषेतून झालेल्या शिक्षणातूनच आपण साहित्याच्या वाटा निवडत असतो.  ती संधी मराठी विभागाच्या ...

खेळाडूंनी क्रीडा प्राविण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ताही सांभाळावी - राष्ट्रीय जलतरणपटू कविता चिट्टिअप्पा

इमेज
    संगमेश्वरचा 69 आणि 70 वा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात सोलापूर , दि. 28 जानेवारी :               विद्यार्थी जीवनामध्ये खेळाला महत्त्वाचे स्थान असते.   त्यामधून शारीरिक व मानसिक विकास घडून येतो. खेळातून विद्यार्थ्यांना ऊर्जा मिळते , त्यांचा आत्मविश्वास वाढतो , शारीरिक विकास होतो.   असे असले तरी खेळाडूंनी मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे आहे.   कारण यातून त्यांचा बौद्धिक विकास होतो , त्यांची गुणवत्ता वाढते ज्याचा उपयोग जीवनात यशस्वी होण्यासाठी पूरक ठरतो.   म्हणून प्रत्येक खेळाडूने क्रीडा प्राविण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ताही सांभाळावी असे विचार राष्ट्रीय जलतरणपटू कविता चिट्टिअप्पा यांनी व्यक्त केले.             संगमेश्वर कॉलेजमध्ये 69 आणि 70 व्या क्रीडा पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास मंचावर श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा सोलापूर विद्यापीठाचे प्रथम कुल...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांना व्यापक संधी - उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर

इमेज
संगमेश्वरचा 69 आणि 70 वा वार्षिक शैक्षणिक पारितोषिक वितरण समारंभ

संगमेश्वरच्या क्रीडांगणावर भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

इमेज
 भारताचा ७४ वा प्रजासत्ताक दिन संगमेश्वरमध्ये मोठ्या उत्साहात साजरा संगमेश्वरच्या क्रीडांगणावर भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या  निमित्ताने  टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन  सोलापूर प्रतिनिधी  भारताच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन संगमेश्वरच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आले होते. याचे उद्घाटन संस्थेचे सचिव धर्मराज काडादी यांच्या हस्ते झाले. प्रारंभी सर्व संघांची ओळख सचिवांनी करून घेतली. त्यानंतर नाणेफेकी झाली.सुरुवातीच्या संघामध्ये सामना सुरू झाला . यावेळी संगमेश्वर शिक्षण संकुलाचे प्राध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                स्पर्धा यशस्वी यशस्वीतेसाठी सर्व विभाग प्रमुख, तसेच जिमखाना विभाग प्रमुख आनंद चव्हाण, विक्रांत विभुते, यांनी परिश्रम घेतले. यामध्ये ज्युनिअर सायन्स, ज्युनिअर आर्ट्स,ज्युनिअर कॉमर्स, शिक्षकेतर कर्मचारी संघ आणि व्यवस्थापन व संगणक शास्त्र संघ या संघात बाद ...