पोस्ट्स

विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते ----- राहुल बुऱ्हाणपुरे

इमेज
 वालचंदच्या ओंकार लांगळेच्या उपकरणास प्रथम क्रमांक    सोलापूर ( दिनांक 22  )"विज्ञान प्रकल्प प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळते; महाविद्यालयीन जीवनात अशा  प्रकल्प प्रदर्शनातून  नक्कीच उद्याचे  संशोधक घडतील असा विश्वास वाटतो '' असे मत टाटांच्या गाड्यांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी ऑटोमोबाईल पार्ट बनवणारे सोलापूरचे युवा संशोधक राहुल बुऱ्हाणपुरे यांनी  व्यक्त केले. ते सायन्स सेंटर सोलापूर आणि संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात संगमेश्वर कॉलेजमध्ये बोलत होते. याप्रसंगी मंचावर प्राचार्य  ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, परीक्षक ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ प्राचार्य जे. डी. जाधव, प्रा.धनंजय शहा, प्रा. पी. ए. येळेगावकर , प्रा.डॉ.नागेश नकाते आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर  प्रमुख पाहुण्यांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. त्यानंतर राहुल बुऱ्हाणपुरे यांचे मनो...

समाज हितासाठी वैज्ञानिक जाणिवा ठेवून अभ्यास करा - सीईओ मनीषा आव्हाळे

इमेज
 दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन   सोलापूर ( दिनांक २१ ) " विद्यार्थ्यांना विज्ञानातील प्रयोगांचा वापर हा समाजहितासाठी करावा. आपल्याला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग  जनतेचे जीवन समृद्ध करण्यासाठी झाला तर खऱ्या अर्थाने आपण विज्ञानाचा विद्यार्थी असल्याचं आपल्याला अभिमान वाटेल,म्हणून समाज हितासाठी वैज्ञानिक जाणिवा ठेवून अभ्यास करा  ''  असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी व्यक्त केलं त्या संगमेश्वर कॉलेज व सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभात बोलत होत्या.  याप्रसंगी  सायन्स सेंटरचे क्युरेटर राहुल दास, प्र. प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे,  कर्मयोगी कै. अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयाचे प्राचार्य सचिन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.  प्रारंभी उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी  या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाच्या मागचा हेतू स्पष्ट केला. त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांचा सत...

संगमेश्वरच्या वाणिज्य प्रश्नमंजूषेत जान्हवी आणि आयेशा प्रथम

इमेज
   महाविद्यालयीन युवकांनी उद्योग विश्वातील नवतंत्रज्ञान जाणावे     सीए सौरभ कोठारी सोलापूर  ( दिनांक २० )  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग वाणिज्य शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या 'बिझनेस क्वीझ २०२३' मध्ये संगमेश्वरच्या जान्हवी रोणे, आयेशा इनामदार यांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक गणेश आंदोडगी, सुजय बोरना हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या संघाने पटकाविला. उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक - आर्यन जाजू, श्रावण खडलोया ( हिराचंद नेमचंद  कॉलेज ऑफ कॉमर्स ) द्वितीय उत्तेजनार्थ -   सचिन सणके, बाळू गुत्तीकोंडा ( कुचन हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सोलापूर) उत्तेजनार्थ तृतीय क्रमांक - आदित्य पोटाबत्ती, वैष्णवी सगरशेट्टी  ( दयानंद कॉलेज ,सोलापूर) यांनी मिळवला. प्रमुख पाहुणे सीएस सौरभ कोठारी,  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी व्यवस्थापन समिती सदस्य व श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुष्पराज काडादी यांच्या हस्ते या विजेत्यांचा रोख रक्कम स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन  गौरव करण्यात आला. याप्रसंगी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवे...

संगमेश्वरच्या विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती

इमेज
 सोलापूर(दिनांक १८ ) संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग कला शाखा समाजशास्त्र विभागाच्या आणि जिल्हा निवडणूक शाखा अंतर्गत उत्तर तहसील कार्यालय यांच्या  वतीने  मतदार जनजागृती अभियानांतर्गत कॉलेज प्रांगणासमोरील मुख्य रस्त्यावरमतदारांना मतदार नाव नोंदणीसाठी आवाहन करण्यात आले. हातात 'चला मतदान करूया, देशाची प्रगती करूयात', ' मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो',  ' ना जातीवर ना धर्मावर,  बटन दाबा कार्यावर,' ' मतदानाचा अभियान, लोकशाहीची आहे शान,'  'छोडकर सारे काम, चालू करो मतदान.'  असे फलके घेऊन ऋग्वेद देशमुख, शशांक वाघमारे, रवी तळभंडारे, साक्षी पाटील,  मोहिनी कराडे यांच्यासह विद्यार्थ्यांनी जनतेशी संवाद साधला.  या अभियानासाठी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे, तहसीलदार सैपन नदाफ  यांचे मार्गदर्शन लाभले  यामध्ये कला विभाग समन्वयक शिवशरण दुलंगे, प्रदीप आर्य, हर्षवर्धन पाटील  मतदार नाव नोंदणी अधिकारी,नायब तहसीलदार सुधाकर बंडगर आदी मान्यवर उपस्थित होते.

समर्पित भावनेने प्र.प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई यांनी कार्य केले

इमेज
  संगमेश्वर कॉलेजमध्ये सेवानिवृत्ती निमित्त सत्कार     सोलापूर ( दिनांक ३०  नोव्हेंबर) '' प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी समर्पित भावनेने केलेले कार्य  पुढच्या पिढीला मार्गदर्शक आहे. '' असे गौरव उदगार  संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी यांनी काढले. ते प्र.प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे निमंत्रित शैक्षणिक सल्लागार डॉ.प्रमोद दर्गोपाटील, रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.डी.गोटे,सौ.सौ माधवी देसाई आदी उपस्थित होते.    प्रारंभी  उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपल्या प्रास्ताविकात प्राचार्यांनी आजपर्यंत  केलेल्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर संस्थेच्या वतीने प्राचार्य  प्र.  डॉ.राजेंद्र देसाई यांचा सपत्नीक सत्कार झाला.  त्यानंतर प्रा .डॉ.एस. एस. पाटील,प्रा.शहानुर शेख,डॉ.शुभांगी गावंडे, चंद्रकांत हिरतोट,डॉ. वंदना पुरोहित,डॉ.प्रमोद दर्गोपाटील ...

संशोधकाच्या प्रात्यक्षिकातील ज्ञान रसायनशाश्त्रात महत्वाचे - निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर

इमेज
पदव्युत्तर  रसायनशास्त्र  विभाग आणि (सेंद्रीय रसायशास्त्र ) संशोधन प्रयोग शाळेचे उदघाटन  सोलापूर प्रतिनिधी  "आपण जे शिकलात ते कळलंय, कळलेलं प्रत्यक्ष कार्यात वापर करता येते का? आपल्याकडच्या परीक्षा त्यात पडलेले गुण यावरील संशोधन संस्थांचा विश्वास उडालेला आहे. म्हणून संशोधन संस्था स्वतंत्र परीक्षा घेतात. ही गरज का निर्माण झाली याचा शोध घेतल्यानंतर शिक्षण संस्थांमध्ये तयार होणारे पदवीधारक  या  सर्वांचे मशीन्स झाले आहेत. हे दुर्दैव आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष कृतीत  आणण्यामुळे संशोधकाला प्रोत्साहन मिळेल. आकलन, प्रात्यक्षिकातील ज्ञान यावर रसायनशाश्त्र संशोधनातील ज्ञान तपासले जाते. त्यामुळे प्रात्यक्षिकात अर्थात प्रॅक्टिकल्समधील तरुणांनाच रसायनशास्त्र संशोधनात संधी आहेत. भविष्यातील मिळालेल्या कालावधीचा वेध तुम्ही कसे घेता हे महत्त्वाचे आहे.संशोधकाच्या प्रात्यक्षिकातील ज्ञान रसायनशाश्त्र संशोधनात महत्वाचे आहे हे जाणून घ्या " असे प्रतिपादन  निवृत्त शास्त्रज्ञ वेंकटेश गंभीर (बी. ए.आर.सी. व टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च)  यांनी केल...

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

इमेज
 वाहनांचा वेग अनिवार झाला की अनेक अपघातांना निमंत्रण मिळते या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम सामान्य नागरिकांना कळावे आणि  त्याचे प्रबोधन करावे या हेतूने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सात रस्ता इथल्या गजबजलेल्या ठिकाणी  हातामध्ये फलक घेऊन नागरिकांचे  प्रबोधन केले. जे वाहतुकीचे नियम पाळत आहेत त्यांचं कौतुक करून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. यात  संगमेश्वर कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.   उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी प्रशांत वनवे , तेजस्वीनी वायचळ, संगमेश्वर कॉलेज कला विभागाचे समन्वयक प्रा. शिवशरण दुलंगे, प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. प्रदीप आर्य यांचा सहभाग होता. या उपक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांचे मार्गदर्शन लाभले.कनिष्ठ विभागाच्या समाजशास्त्र आणि संस्कृत विभागाच्या वतीने  हा उपक्रम राबवला गेला . सोलापूर ( दिनांक २३ )