पोस्ट्स

शोधनिबंधातून विद्यार्थ्यांनी सादर केला केंद्रीय अर्थसंकल्प

इमेज
संगमेश्वरमधील बीए  सिव्हिल सर्विसेस विभागाचा उपक्रम   सोलापूर प्रतिनिधी  - नुकताच  केंद्रीय अर्थसंकल्प 2024 अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सभागृहात सादर केला. त्यातील बारकाव्यांवर बी.ए. सिविल सर्विसेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी  शोध निबंधाच्या सादरीकरणातून  वैशिष्ट्यपूर्ण  बाबी सांगून विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले.  यामध्ये अर्थसंकल्पावर दृष्टी टाकताना विद्यार्थ्यांनी  पीएम गतिशक्ती , पीएम गतिशक्तीचा राष्ट्रीय बृहत आराखडा, रस्ते वाहतूक, बहुपर्यायी लॉजिस्टिक पार्क, रेल्वे मार्ग, पर्वतमाला,  सर्वसमावेशक विकास यामध्ये शेती,  केन बेतवा नदी जोड प्रकल्प. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्र , कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्य , सक्षम अंगणवाडी,  प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा,  सर्वांसाठी आवास,  चैतन्यपूर्ण गावे, बँकिंग, इ पारपत्र ,शहरी नियोजन, भूमी अभिलेख व्यवस्थापन , कंपनी बंद करण्यासाठीची प्रक्रिया वेगवान कशी करणार, दूरसंचार निर्यात प्रोत्साहन , संगणक क्षेत्रात आत्मनिर्भरता , ऊर्जा परिवर्तन आणि हवामान संबंधी कृती...

युवकांनो नोकऱ्यांपेक्षा उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा

इमेज
संगमेश्वर बीबीए विभागात उद्योजकता कार्यशाळेत  तज्ञांचे मत सोलापूर प्रतिनिधी  - '' नोकऱ्या शोधत बसण्यापेक्षा स्वयंप्रेरणेने   आणि अनुभवाच्या बळावर उद्योजक होण्यासाठी प्रयत्नशील राहा.   उद्योजक होण्यासाठी फक्त दृष्टी असणे गरजेचे आहे. सोबत बदलते तंत्रज्ञान , मार्केटिंगचे कौशल्य , सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी असेल तरच यशस्वी उद्योजक म्हणून आपण इतरांना नोकऱ्या देऊ शकतो. '' असे मत   संगमेश्वर कॉलेज व्यवस्थापनशास्त्र विभाग आयोजित उद्योजकता कार्यशाळेत   तज्ञांनी मांडले. याप्रसंगी प्र . प्राचार्य ऋतुराज बुवा , समन्वयक गौरव जुगदार आदी उपस्थित होते.                                प्राचार्य प्रा.डॉ.आर.पी.बुवा यांनी महाविद्यालयाच्या उद्योक क्षेत्रातील मान्यवर विदयार्थ्यांची उदाहरणे दिली. संगमेश्वरमधून शिक्षण घेऊन उद्योग विश्वात   कित्येक विद्यार्थी आज मितीला स्थिरावले आहेत असेही ते म्हणाले. भारताच्या समकाली...

भाषिक कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो अश्विनी मोरे

इमेज
  संगमेश्वरच्या अभिवाचन सुलेखन स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा संपन्न     सोलापूर प्रतिनिधी - '' विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनानंतर महाविद्यालयातील वेगवेगळ्या भाषिक उपक्रमात सहभागी झाल्याने   व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. सर्वांगण विकासात भाषा ही अभिव्यक्त होण्यासाठी सशक्त माध्यम आहे.   या माध्यमाचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे. कॉलेजमध्ये हिंदी , मराठी , कन्नड , संस्कृत , इंग्रजी या पाच भाषा   अध्ययनासाठी असल्याने बहुभाषिक वृत्तीतून आपण स्वतःला घडवू शकतो. '' असे मत सेवासदनच्या शिक्षिका , अभिवाचिका , निवेदिका अश्विनी मोरे   यांनी मांडले. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या भाषा संकुलातर्फे आयोजित केलेल्या   अभिवाचन व सुलेखन स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमात   बोलत होत्या. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे   उपस्थित होते. निकाल - मराठी अभिवाचन ( ९ वी १० वी गट ) प्रथम -   समृद्धी बताले   - ( बी.एफ.दमाणी प्रशाला ) द्वितीय विभागून - ( बी.एफ.दमाणी प्रशाला )श्रद्धा दुधनीकर ( सिद्धेश्वर कन्या प्रशाला ...

जिल्हास्तरीय वेब पेज डिझानिंग स्पर्धेत चंडकचे बावधनकर बंधू प्रथम

इमेज
  संगमेश्वर कॉलेजच्या व्यवस्थापन व संगणकशास्त्र विभागाचा उपक्रम                          सोलापूर प्रतिनिधी-   बदलत्या डिजिटल युगाबरोबरच आपल्याला  या तंत्रयुगाची माहिती व्हावी  या उद्देशाने  संगमेश्वर कॉलेज व्यवस्थापन व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने सॅन प्रतिभा शोध २०२४ अंतर्गत जिल्हास्तरीय  वेब पेज  डिझाइन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एसइएस चंडक पॉलिटेक्निकच्या अथर्व व प्रणव  बावधनकर बंधूंनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ.प्रमोद दर्गोपाटील म्हणाले , '' डिजिटल तंत्रज्ञानाबरोबर वेब डिझाइन महत्त्वाचे आहे. वेब डिझाईन मधील कुशल तंत्र तुमच्या ब्रँडवर परिणाम करतात उत्तम डिझायनिंग असलेले ब्रँड हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतात. तुम्ही वापर कर्त्यावर टाकलेली छाप त्यांना तुमच्या पेजवर राहण्यासाठी आणि तुमच्या व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करता. चांगली डिझाइन पेजवर लीड्स टिकवून ठेवण्यास मदत करते. तसेच वेब पेजद्वारे आपण ऑनलाइन व्यव...

संगमेश्वर मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात

इमेज
 सोलापूर प्रतिनिधी   ७५  वा भारतीय प्रजासत्ताक दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये  मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ९  महाराष्ट्र एनसीसी बटालियनच्या विद्यार्थ्यांनी  संचलन करत प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित केले. प्र.प्राचार्य प्रा. डॉ. ऋतुराज बुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याप्रसंगी   डॉ. प्रमोद दर्गोपाटील,प्राचार्य डी. एस. गोठे , प्रा. डॉ.राजकुमार मोहोरकर , उपप्राचार्य प्रसाद कुंटे, प्राचार्य सचिन गायकवाड,  उपप्राचार्य दत्तकुमार म्हमाणे,आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या आगमनानंतर   एनसीसी विभागाच्या सूचनेनुसार ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीतानंतर शिक्षण संकुलातील  पुरस्कार प्राप्त प्राध्यापक, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. याच कार्यक्रमात अग्निविर साठी निवड झालेल्या कॉलेजच्या  विद्यार्थी पालकांचा सन्मान करण्यात आला. 

स्पर्धा परीक्षेच्या बदलत्या तंत्राचा अभ्यास महत्त्वाचा - वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे

इमेज
 संगमेश्वर कॉलेजच्या सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे बक्षीस वितरण सोलापूर प्रतिनिधी -    '' स्पर्धा परीक्षेत आयोगाचे बदललेले  तंत्र आपण आत्मसात केले तर नक्कीच आपण  स्पर्धा परीक्षेमध्ये  यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयीन जीवनातच आपण तयारीला लागली पाहिजे.  मायक्रो नोट्स पासून ते  वर्तमानपत्राच्या वाचनापर्यंत  कठोर नियोजन,  सातत्यपूर्ण अभ्यास  या बळावर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.'' असा विश्वास तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी व्यक्त केला.  ते संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या सामान्य ज्ञान स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी बोलत होते. मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, कला शाखा समन्वयक शिवशरण दुलंगे उपस्थित होते.   संगमेश्वर गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. विठ्ठल आरबळे यांनी  पाहुण्यांचा परिचय करून दिला.त्यानंतर  शिवशरण दुलंगे यांनी प्रास्ताविक केले . प्रास्ताविका नंतर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. पाहुण्यांनी दिलखुलास संवाद साधत अनेक तपास कथांमधून...

वैशिष्ट्यपूर्ण समृद्ध भारतीय परंपरा कृतीतून जपूया उपप्राचार्य डॉ .सुहास पुजारी

इमेज
संगमेश्वर मध्ये बी.ए.सिव्हिल सर्व्हिसच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक दिन   सोलापूर प्रतिनिधी - '' भारताला समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे.ती अनादिकालापासून भारतीय लोक जपत आले आहेत.  आपण विद्यार्थी दशेत  वेगवेगळ्या पोशाखापासून, राज्या राज्यातल्या लोकसंस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे.  भारतीय प्रशासकीय सेवेत येताना, लोकप्रशासनाची अंमलबजावणी करताना  सांस्कृतिक गोष्टी जाणल्या पाहिजेत, समजून घेतल्या पाहिजेत. या बाबी समजावून घेतल्या तर व्यक्तीच्या  व्यक्तिमत्त्वाची उत्तम जडणघडण होते.'' असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी केले.  याप्रसंगी वंदना भानप, विशाल राऊत, राहुल साळुंखे, रवींद्र म्हमाणे,नविता बल्लाळ,  महानंदा मोटगी आदी उपस्थित होते.  ते  संगमेश्वर कॉलेजमध्ये बी.ए.सिव्हिल सर्विसेस विभागाच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या सांस्कृतिक दिनाच्या  कार्यक्रमात बोलत होते.   प्रारंभी गणरायाला वंदन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.  प्रास्ताविक वंदना भानप यांनी केले.त्यानंतर  प्रमुख पाहुण्यांचा सत्कार झाला. सत्कारानंतर...