पोस्ट्स

जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शन,सामान्य ज्ञानासह विविध स्पर्धांचे आयोजन

इमेज
सोलापूर दिनांक १९  -  संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने दिनांक 22, 23 आणि 24 डिसेंबर रोजी अनुक्रमे जिल्हास्तरीय विज्ञान प्रकल्प प्रदर्शन ( दि २२,२३ ),बिझनेस क्विझ (दि २२ ),सामान्य ज्ञान स्पर्धा (दि २३ ) ,सुलेखन व अभिवाचन ( दि २४ ) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विज्ञान प्रकल्प प्रदर्शनामध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, तंत्रनिकेतन विद्यालय, शेतकी महाविद्यालयामधीलविद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे यंदाचे हे नववे वर्ष असून शहर व परिसरातील विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.  २२  डिसेंबरला वाणिज्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना वाणिज्य क्षेत्रातील स्थित्यंतरे, या क्षेत्रातील आव्हाने यांची जाण व्हावी. त्यांच्या ज्ञानात भर पडावी. या उद्देशाने बिजनेस क्विझचे आयोजन करण्यात आले आहे. विविध महाविद्यालयातील संघ यामध्ये सहभागी होणार आहेत. सकाळी दहा वाजता ही स्पर्धा संगमेश्वर कॉलेजच्या सभागृहात संपन्न होणार आहे.  सध्याचे युग हे स्पर्धा परीक्षेचे असल्याने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्या...

राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या ताऱ्यांचा आम्हाला अभिमान --- धर्मराज काडादी

इमेज
खेलो इंडिया आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये यशस्वी  खेळाडूंचा कॉलेजच्या वतीने सत्कार सोलापूर -  '' कॉलेज स्तरावर वैविध्यपूर्ण क्रीडा प्रकारात संगमेश्वरचे विद्यार्थी नेहमी अग्रेसर असतात. त्यानंतर पुढील टप्पा विद्यापीठ, विभाग असे करत करत राज्य आणि राज्याचे प्रतिनिधित्व करतात. राज्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर पदक घेऊन येतात. ही परंपरा खूप जुनी आहे. या परंपरेला साजेसे असे काम करणाऱ्या या क्रीडांगणावरील ताऱ्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.  मी त्या सर्व क्रीडांगणावरील ताऱ्यांचे, त्यांच्या पालकांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो ''  असे गौरव उद्गार संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी काढले. ते राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारात चमकलेल्या खेळाडूंचा सत्कार करताना बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर व्यवस्थापन समिती सदस्य शरणराज काडादी, शैक्षणिक सल्लागार प्रमोद दर्गोपाटील, प्राचार्य ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे आदी उपस्थित होते.  कॉलेजच्या वतीने सत्कार करण्यात आलेले विद्यार्थी-- १ विनीत दिनकर -  राज्यस्तरीय अंत...

महाविद्यालयीन जीवनात भाषा शिक्षण जगण्याचं बळ देते - कवी इंद्रजीत घुले

इमेज
दृकश्राव्य माध्यमासाठीचे सादरीकरण याविषयीचे मार्गदर्शन सोलापूर - संगमेश्वर कॉलेज भाषा संकुलाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना  ' रेडिओ जॉकी' विषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.आकाशवाणी या श्राव्य माध्यमासाठी मुलाखत कशी घ्यावी किंवा घ्यावी. यासंदर्भातले मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शनात आकाशवाणीत मुलाखतीसाठी आलेल्या इंद्रजीत घुले यांचा संवाद घडवून आणला. या संवादात त्यानी दृकश्राव्य माध्यमासाठीचे सादरीकरण याविषयी दिलखुलास संवाद साधला. ते म्हणाले की,'' महाविद्यालयीन जीवनात भाषेची गोडी लागली की आपण झपाट्याने वाचत जातो. या वाचण्यातूनच प्राप्त परिस्थिती मधून आपण कसे मार्ग काढू शकतो याचे आकलन होते. आपोआपच व्यक्तिमत्व घडण्याची प्रक्रिया होते. जडणघडणीच्या काळात भाषा जगण्याचं बळ देते''.  याप्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी,अशोक निंबर्गी,सायबण्णा निंबर्गी उपस्थित होते.             प्रारंभी संतोष पवार यांनी 'रेडिओ जॉकी ' संदर्भात आकाशवाणीचा इतिहास सांगत, रेडिओ जॉकीतील स्थित्यंतर...

बारावी बोर्ड परीक्षेत कृतीपत्रिकेतील लेखन कौशल्य महत्वाचे - राज पवार

इमेज
भाषा संकुलच्यावतीने ' परीक्षेला जाता जाता ' या मालेत व्याख्यान  सोलापूर -( दिनांक ९ ) ''बारावीची बोर्ड परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पायरी मानली जाते. या परीक्षेत मराठी विषयासाठी नव्या मूल्यांकन पद्धतीनुसार कृतीपत्रिकेचा अवलंब केला गेला आहे. कृतीपत्रिकेतील विविध प्रश्नप्रकार विद्यार्थ्यांच्या ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन अशा समग्र भाषिक कौशल्यांची परीक्षा घेतात. यापैकी *लेखन कौशल्याचा* विभाग अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो, कारण तो विद्यार्थ्यांच्या भाषेतील प्रावीण्य, मांडणी क्षमता आणि विचारसंपन्नता यांचे सम्यक मूल्यमापन करतो. बारावी बोर्ड परीक्षेत कृतीपत्रिकेतील लेखन कौशल्य महत्वाचे आहे. असे मत दयानंद महाविद्यालयाचे कनिष्ठ विभागातील अध्यापक राज पवार यांनी मांडले. भाषा संकुल आयोजित मराठी कृतीपत्रिकेवरील सविस्तर मार्गदर्शनात बोलत होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे, प्रा.अशोक निंबर्गी,प्रा.दत्तात्रय गुड्डेवाडी  उपस्थित होते.   पुढे म्हणले की -लेखन कौशल्यामध्ये पत्र, संवाद, मुलाखत, जाहिरात, वृत्तलेखन, रिपोर्ट, ब्लॉग, ई-मेल, सूचना, अप...

भगवद्गीतेतील विचार विद्यार्थ्यांना ध्येयप्राप्तीसाठी प्रेरणादायी -उपप्राचार्य प्रसाद कुंटे

इमेज
  संगमेश्वर कॉलेज सोलापूर( कनिष्ठ विभाग )भाषा संकुल-  संस्कृत विभाग  आयोजित गीता जयंती निमित्त कार्यक्रमांमध्ये बोलताना भगवद्गीतेतील अर्जुनाचे प्रश्न आणि श्रीकृष्णाने केलेले त्याचे समाधान हे विद्यार्थ्यांसाठी आजच्या काळात ही प्रेरणादायी आहे. अर्जुनाने मिळवलेले यश त्यासाठी स्वीकारलेला मार्ग हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे गीता जयंतीच्या निमित्त बोलताना उपप्राचार्य प्रसाद कुंटे यांनी आपले विचार व्यक्त केले.  कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्रीमद्भगवद्गीता ग्रंथ पूजने झाली. त्यानंतर विद्यार्थिनी भाविका गोयल हिने श्रीमद् भगवद्गीता सार सांगितला. साक्षी मेह्त्रे या विद्यार्थिनींने  पंधरावा अध्याय पठन केला त्यानंतर कुरुक्षेत्राच्या रणांगणावरील धृतराष्ट्र-  संजय ,श्रीकृष्ण- अर्जुन संवाद श्रीकृष्ण- सृष्टी देवडीकर अर्जुन -प्राजक्ता रबकई धृतराष्ट्र- यज्ञेश जोशी संजय -आदिती पाटील या  विद्यार्थ्यांनी   नाट्यरूपाने सादर केले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे भाषा समन्वयक दत्तात्रय गुड्डेवाडी संस्कृत शिक्षक प्रदीप आर्य संतोष पवार अ...

युवा महोत्सवात उपविजेत्या कलाकारांचा कौतुक सोहळा

इमेज
सोलापूर प्रतिनिधी -  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २१ व्या युवा महोत्सवात उपविजेत्या ठरलेल्या संगमेश्वर कॉलेजच्या कलाकारांचा कॉलेजच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी विजेत्या सर्व संघाचे कौतुक केले आणि त्यांच्या कारकिर्दीस  शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना सचिव ज्योती  काडादी यांनी कलाकारांनी घेतलेल्या कष्टाचे फळ मिळाले. भविष्यातही असेच अथक परिश्रम करून आपण आपला संघ पुढे जाण्यासाठी सतत प्रयत्नशील राहू. संगमेश्वर कॉलेजची  क्रीडा क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक परंपराही खूप मोठी आहे. तो वारसा जपण्याचे  कर्तव्य कलाकारांनी निभावले आहे.असा मनोदय व्यक्त केला. कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सत्कार समारंभात प्रारंभी प्राचार्य ऋतुराज बुवा  यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला.दादासाहेब खांडेकर यांनी सविस्तर वृत्तांत सांगितला. त्यानंतर कलाकारांचा सत्कार झाला. सत्कार नंतर गोल्डन गर्ल पुरस्कार विजेती सई दरेकर आणि गतवर्षीच्या गोल्डन बॉय पुरस्कार विजेता जैद शेख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या....

हिंदी विभागातर्फे आयोजित एकदिवसीय कार्यशाला -अनुसंधान प्रविधि आणि प्रक्रिया

इमेज
  संगमेश्वर महाविद्यालय, सोलापुर स्वायत्त हिंदी विभागातर्फे आयोजित एकदिवसीय कार्यशाला "अनुसंधान प्रविधि आणि प्रक्रिया" या विषयावर 15 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडली. यावेळी मुख्य पाहुणे व विषय प्रवक्ते डॉ. राजकुमार वडजे यांच्या करकमलांद्वारे दीपप्रज्वलन करण्यात आले. संगमेश्वर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांच्या हस्ते वडजे यांचा सत्कार करण्यात आला. सुरुवातीला डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी प्रस्तावना मांडली तर सबा शेख यांनी मुख्य पाहुण्याची ओळख करून दिली. "अनुसंधान प्रविधि" या विषयावर बोलताना डॉ. राजकुमार वडजे यांनी सांगितले की, "विविध विषयांवर अनुसंधान होणे अत्यावश्यक आहे. अनुसंधानाला मागणीच नाही तर शोधाची गरज आहे. नवीन शोधामुळेच अनुसंधानाला नवीन दिशा मिळते आणि या शोधात अनुसंधानकर्त्याने पूर्ण प्रयत्न करून जे लपलेले आहे ते बाहेर काढण्याचे काम अनुसंधानाद्वारे करणे आवश्यक आहे. अनुसंधानाच्या विविध शैली आहेत, जसे की पत्रलेखन शैली, प्रश्नोत्तर शैली, मुलाखत शैली, ललित गद्य शैली, भाषाविज्ञान शैली, साहित्यिक शैली. या विविध शैलींद्वारे अनुसंधानाला अंतिम रूप दिले जाऊ शकत...