पोस्ट्स

विद्यार्थ्यांनो उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे - सुवर्णा झाडे

इमेज
 संगमेश्वरमध्ये उद्योगविश्व आणि करिअर या विषयावर व्याख्यान  सोलापूर दिनांक 28 जुलै       ''कठोर मेहनत,सातत्य, जिद्द, चिकाटीच्या बळावर आपले करिअर आपण नक्कीच उभे करू शकतो . उद्योजकता ही सध्या काळाची गरज बनली आहे. रोजगार देणारे उद्योजक निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन जीवनातच दिशा ठरवली पाहिजे.उद्योग विश्वातील करिअरमध्ये कठोर परिश्रम हवे.त्यादृष्टीने तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण आपण घेतले पाहिजे. उद्योग विश्वातील नवे प्रवाह,आर्थिक जोखीम  आपण  जाणून घ्या. '' असा मोलाचा सल्ला सुवर्णा झाडे -खेलबुडे यांनी दिला. त्या संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभागाच्या वतीने माझं करिअर या उपक्रमांतर्गत आयोजित केलेल्या 'करियर इन आंत्रप्रेन्यूरशिप' या विषयावर बोलत होत्या. याप्रसंगी मंचावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे,  पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे उपस्थित होते. वाणिज्य विभाग प्रमुख बसय्या हणमगाव  यांनी आपल्या प्रास्ताविकात आर्थिक जगतात  जोखीम स्वीकारून जो नवे उद्योग उभारतो तोच या क्षेत्रामध्ये  सक्षम होऊ शकतो असे सांगत प्रास्ताविक केले. प्रा. संगीता म्हमाणे यांनी सूत्...

कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील संधीचा लाभ घ्या - उपप्राचार्य प्रसाद कुंटे

इमेज
    संगमेश्वर कॉलेजमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्यांचे  स्वागत  सोलापूर प्रतिनिधी  ''कला,वाणिज्य आणि विज्ञान क्षेत्रातील वैविध्यपूर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. त्यासाठी  कठोर मेहनत, सातत्यपूर्ण परिश्रम पूर्वक नियोजनाची गरज आहे.'' असे प्रतिपादन संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य प्रसाद कुंटे यांनी केलं. कला,वाणिज्य आणि विज्ञान या तीनही विभागाच्या इयत्ता अकरावीच्या  स्वागत समारंभ आणि अभिभाषण प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी  कला समन्वयक - शिवशरण दुलंगे वाणिज्य विभाग समन्वयक - बसय्या हणमगाव,  विज्ञान विभाग समन्वयक - रामराव राठोड, पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे आदी उपस्थित होते.   कला शाखेतून करिअर करत असताना  कला, साहित्य, संगीत याबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या आवडीच्या क्षेत्रात काम करत स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपले करिअर आपण करू शकता.  वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी   या स्पर्धा परीक्षांकडे वळताना, बँकिंग क्षेत्रातील संधीचाही लाभ घ्यावा.  विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी आयआयटी, जेईइ, नीट, सीईटी या स्पर्धा परीक्षा...

संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा

इमेज
  संगमेश्वरमध्ये हँड्स ऑन रोबोटिक्सची कार्यशाळा सोलापूर प्रतिनिधी- “ आत्मनिर्भर भारत होण्यासाठी मिळालेले नॉलेज वाढवा. जो अभ्यास कराल , संशोधन कराल त्याचे पेटंट मिळवायचा प्रयत्न करा आणि महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढवा." असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र देसाई यांनी केले.संगमेश्वर कॉलेजमधील व्होकेशनल इलेक्ट्रॉनिक्स विभाग व फिजिक्स (ज्यु.) विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "हँड्स ऑन रोबोटिक्स" या विषयावरील कार्यशाळेच्या   उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्य प्रसाद कुंटे  ,  पर्यवेक्षक मल्लिनाथ  साखरे, भौतिक शाश्त्र विभागप्रमुख  डॉ.शुभांगी    गावंडे , तज्ञ मार्गदर्शक डॉ. बचुवार , डॉ.जोगदे उपस्थित होते.प्रास्ताविक प्रा. शुभदा  कुलकर्णी यांनी केले. त्यानंतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .सूत्रसंचालन प्रा. प्रियंका पाटील यांनी केले. तर आभार प्रा.चंद्रकांत हिरतोट यांनी मानले.या प्रसंगी प्रा.प्रशांत शिंपी , प्रा.बाळकृष्ण कापसे ,  प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर ,  प्रा.नागेश कोल्हे...

नीट परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून शशिधर नामतुरे प्रथम

इमेज
 नीट परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून शशिधर नामतुरे प्रथम  सोलापूर प्रतिनिधी :   एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे.या परीक्षेत संगमेश्वर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले निकाल याप्रमाणे - शशिधर नामतुरे ५२९(प्रथम), शिफा सवार ४९९(द्वितीय) , प्रियांशु रंजन ४८३(तृतीय) , गौतमी बनसोडे ४५१, संहिता वठारे ३७७, मानसी पाटील ३६७, ओंकार शीशेट्टी ३४४, शकुंतला कलशेट्टी, समर्थ अक्कलकोटे, ऐश्वर्या बिराजदार, सुखदा मालखरे, मुन्सिफा नदाफ, तेजस आयवळे, स्नेहल भालेराव, इशा काझी , मुजम्मिल कादरी, गणेश सकट. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. राजेंद्र देसाई , उपप्राचार्य श्री. प्रसाद कुंटे, पर्यवेक्षक श्री मल्लिनाथ साखरे, विज्ञान शाखा समन्वयक श्री. रामराव राठोड सर्व प्राध्यापक वृंद, कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले.कॉलेजच्या वतीने  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झाला. याप्रसंगी बाळकृष्ण कापसे ,सुषमा पाटील, विशाल जत्ती, सिद्धाराम विजापूरे, डॉ.गणेश मुडेगावकर, संतोष पवारआदी उपस्थित होते. लीना खमितकर सूत्...

एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून संचिता वठारे, नंदिनी सुत्रावे अव्वल स्थानावर

इमेज
  एमएचटी-सीईटी परीक्षेत संगमेश्वर कॉलेजमधून संचिता वठारे, नंदिनी सुत्रावे अव्वल स्थानावर  सोलापूर ( प्रतिनिधी )    महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलकडून एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल काल १२ जूनला जाहीर करण्यात आला. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र (PCB) ग्रुप्ससाठी महाराष्ट्र कॉमन एंट्रेन्स टेस्ट २०२३ चा निकाल घोषीत करण्यात आला. यामध्ये  संगमेश्वर कॉलेजमधून संचिता चंद्रशेखर वठारे ( ९८.०० पर्सेन्टाइल ),नंदिनी नागेश  सुत्रावे ( ९९.६०  पर्सेन्टाइल ) अव्वल स्थानावर राहिले. पर्सेन्टाइलनुसार निकाल - ( PCB ) शकुंतला संतोष कलशेट्टी ९५.६, ओमकार महादेव शिवशेट्टी ९५,मोहम्मद कैफ इब्राहिम बिराजदार ९०.८७,ऐश्वर्या सिद्धाराम बिराजदार ८९ .८१,गणेश शशिकांत सकट ८८.६,शगुन संजय राठोड ८८.१७,निकिता गुरुशांत हावशट्टी ८७.४५,वैष्णवी अजित जाधव ८६.११,प्रिया विनायक परदेशी ८५.५३, विश्वजीत अतुल कोथिंबीर ८५.३८. पर्सेन्टाइलनुसार (PCM) - देवांग नितीन देशपांडे ९८.६९, विद्याराणी पृथ्वीराज देशमुख ९८.५,सलोनी पुष्पराज सिंग बायस ९८....

बारावीत संगमेश्वर कॉलेजचा निकाल ९१.९७ टक्के

इमेज
  बारावीत संगमेश्वर कॉलेजचा निकाल  ९१.९७ टक्के सोलापूर दिनांक ( २५ मे   २०२३ ) येथील संगमेश्वर ज्युनिअर कॉलेज , सोलापूरचा बारावीचा निकाल   ९१ .९७    टक्के इतका लागला. शाखा निहाय निकालाची टक्केवारी पुढीप्रमाणे   - विज्ञान शाखा - ९८.४२ , वाणिज्य शाखा - ९४.२० , कला शाखा -   ७७.९७ टक्के इतका लागला . विज्ञान व कला शाखेत मुलींनी बाजी मारली.तर वाणिज्य शाखेचा राघव विशाल बन्सल (प्रथम ९३.३३) हा विद्यार्थी कॉलेजमधून तिन्ही शाखांमधून प्रथम आला. यशस्वी विद्यार्थी-   विज्ञान शाखेतून - नंदिनी नागेश सुत्रावे ( प्रथम   ८९.००) सलोनी पुषपराजसिंह बायस ( द्वितीय ८७.००) सुहानी ऋषिकेश शाह   (तृतीय ८६.५०) तर वाणिज्य शाखेतून - राघव विशाल बन्सल (प्रथम ९३.३३) वरद विजय जोशी   (द्वितीय ९३.००)समर्थ प्रसन्न स्वामी ( तृतीय ९२.१७) कला शाखेतून   - प्रीती महादेव कोरी ( प्रथम ८९.६७   ) रोहित नारायणारं सुतार ( द्वितीय ८९.५०   ) साक्षी चंद्रकांत करपे ( तृतीय ८८.१७)             या वि...