पोस्ट्स

वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा असा संदेश देत विद्यार्थ्यांचे प्रबोधन

इमेज
 वाहनांचा वेग अनिवार झाला की अनेक अपघातांना निमंत्रण मिळते या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा आणि वाहतुकीचे नियम सामान्य नागरिकांना कळावे आणि  त्याचे प्रबोधन करावे या हेतूने संगमेश्वर कॉलेज कनिष्ठ विभाग प्रबोधन कट्टा आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सात रस्ता इथल्या गजबजलेल्या ठिकाणी  हातामध्ये फलक घेऊन नागरिकांचे  प्रबोधन केले. जे वाहतुकीचे नियम पाळत आहेत त्यांचं कौतुक करून लोकांचे प्रबोधन करण्यात आले. यात  संगमेश्वर कॉलेजच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.   उपप्रादेशिक परिवहनचे अधिकारी प्रशांत वनवे , तेजस्वीनी वायचळ, संगमेश्वर कॉलेज कला विभागाचे समन्वयक प्रा. शिवशरण दुलंगे, प्रा. हर्षवर्धन पाटील, प्रा. प्रदीप आर्य यांचा सहभाग होता. या उपक्रमासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, उपप्राचार्य प्रसाद कुंटे,पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांचे मार्गदर्शन लाभले.कनिष्ठ विभागाच्या समाजशास्त्र आणि संस्कृत विभागाच्या वतीने  हा उपक्रम राबवला गेला . सोलापूर ( दिनांक २३ )

वाचन हीच लेखनाची मूळ प्रेरणा – योगीराज वाघमारे

इमेज
संगमेश्वरमध्ये ' वाचन प्रेरणा '  भित्तीपत्रिकेचे प्रकाशन सोलापूर:      कोणताही लेखक सहजासहजी घडत नाही. त्याला लेखन करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. श्रवण, वाचन, भाषण आणि लेखन ही भाषिक कौशल्ये आहेत. चांगले ऐकणे जसे महत्त्वाचे आहे. तसेच चांगले वाचणे सुध्दा महत्वाचे असते. यातूनच लेखन प्रेरणा मिळत असते. कॉलेज जीवनात भित्तीपत्रिकेच्या माध्यमातून सुरू झालेले लेखन पुढे लेखक म्हणून घडविण्यासाठी प्रेरणादायी ठरते. असे विचार ज्येष्ठ लेखक योगीराज वाघमारे यांनी व्यक्त केले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने मराठी वाङ्‌मय मंडळाच्या अंतर्गत वाचन प्रेरणा विशेषांक २०२३ या भित्तीपत्रिकेचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. १५ ऑक्टोबर हा दिवस भारताचे माजी राष्ट्र्‌पती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म्‌दिवस असून तो वाचन प्रेरणा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनानिमित्त् विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा ही भित्तीपत्रिका तयार केली होती. तिच्या प्रकाशन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून योगीराज वाघमारे उपस्थित होते. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र्‌ देसाई यांनी अध्य...

वक्तृत्व,रंगभरण व पत्रलेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण

इमेज
 आकाशवाणी आणि संगमेश्वर पब्लिक स्कूल यांचा उपक्रम  सोलापूर ( शहर संचार दिनांक १३)   कर्मयोगी कै.अप्पासाहेब काडादी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी या स्पर्धा संगमेश्वर पब्लिक स्कूलमध्ये झाल्या होत्या. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ काल आकाशवाणी सोलापूरचे प्रसारण अधिकारी डॉ.सोमशेखर पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य प्रियांका समुद्रे उपस्थित होत्या.      प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते कर्मयोगी   अ प्पांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले. प्राचार्य प्रियंका समुद्र यांनी प्रास्ताविक केलं. पाहुण्यांची ओळख वंदना श्रीमल यांनी करून दिली.  संस्थेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांच्या सत्कार झाला.  विजेते याप्रमाणे ------------रंगभरण स्पर्धा (गट - एलकेजी युकेजी) प्रथम क्रमांक -  युवनाते उन्नती उमेश (दमाणी  विद्यामंदिर )  द्वितीय क्रमांक -  जगताप श्रावणी विवेक  (राज मेमोरियल इंग्लिश स्कूल)  तृतीय क्रमांक -  बालिंगल जान्हवी राघवेंद्र (प्रिसिजन स्कूल )  गट ...

सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांची निवड करा - राजशेखर शिंदे

इमेज
संगमेश्वरमध्ये उद्योजकता विकासावर वाणिज्य शाखेत मार्गदर्शन  '' वाणिज्य क्षेत्रातील ज्ञान घेताना आपण सेवा क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उद्योगांचा अभ्यास केला, व्यवसायाला सचोटीची जोड दिली, तर सेवा क्षेत्रात उत्तम उद्योग उभारता येईल.  सेवा क्षेत्रातील नवनवीन उद्योग सेवा व्यवसायांची निवड करा'' असे प्रतिपादन राजशेखर शिंदे यांनी केलं. ते 'माझं करियर' अंतर्गत उद्योजकता विकास या विषयावरील मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. मंचावर पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे, वाणिज्य विभाग प्रमुख बसय्य्या हणमगाव उपस्थित होते.  प्रारंभी पर्यवेक्षक मल्लिनाथ साखरे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी  महाविद्यालयीन जीवनातील शिक्षणाबरोबरच उद्योग विश्वातील घडामोडींचा अभ्यास महत्त्वाचा असल्याच सांगितलं. त्यानंतर मार्गदर्शकांचा कॉलेजच्या वतीने सत्कार झाला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना शिंदे यांनी सोलापुरातील शून्यातून उद्योगविश्वात भरारी मारणाऱ्या अनेक यशस्वी तरुणांची यशोगाथा सांगत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत उद्योग व्यवसायासाठी कसे सहकार्य केले जाते याबद्दल विवेचन केले.  ...

विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे – रजनीश जोशी

इमेज
  संगमेश्वरमध्ये मराठी वाङ्मय  मंडळाचे उद्घाटन सोलापूर दिनांक ६  भाषा ही मानवी जीवनातील महत्त्वाचे संवादसाधन आहे. भाषेच्या माध्यमातून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असतो. आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो. बोलणे आणि लिहिणे ही भाषेची महत्त्वाची कार्ये आहेत. यातील लेखन ही कला असून लिपीच्या माध्यमातून ती साध्य् होत असते. सर्जनशील लेखनासाठी अंत: करणात प्रेरणा निर्माण व्हायला हवी. वाचनातून लेखनाचे संस्कार होता. लिहिण्याची उर्जा मिळते. इतरांच्या साहित्याचे वाचन केल्याशिवाय चांगले लिहिता येत नाही. परंतु त्याचे अनुकरण करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी अंत:प्रेरणेतून लेखन करावे. असे विचार ज्येष्ठ पत्रकार व लेखक रजनीश जोशी यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमधील मराठी विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२३- २०२४ मधील मराठी वाङ्‌मय मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कला शाखेचे उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख सुहास पुजारी होते. जोशी यांनी विद्यार्थ्यांना भाषा, साहित्य्‌, समाज आणि संस्कृती विषयी मार्गदर्शन करताना मराठी भाषेचा अभिजातपणा सांगितला. सोलापूरजवळील कुडल...

इंटरनेटच्या आभासी युगात ऑनलाइन धोक्यांची जाणीव करून घ्या. पोलीस निरीक्षक - एस.एस.गजा

इमेज
सायबर गुन्हे जागरूक ते विषयी   पोलिसांनी साधला   तरुणांशी संवाद  सोलापूर शहर प्रतिनिधी  ''इंटरनेटच्या आभासी जगाला भौगोलिक, आर्थिक, सामाजिक असे कोणत्याही प्रकारचे बंधने नाहीत. हे आपण सारेच अनुभवतो आहोत. मात्र  पालक, घरातील प्रौढ व्यक्ती यांनाच 'ऑनलाइन' धोक्यांची व्याप्ती आणि तीव्रता याची जाणीव नसल्याने लहान मुले, विद्यार्थी  सहजपणे ऑनलाइन धोक्यांना बळी पडतात. सायबर सुरक्षा या विषयाबाबत काम करताना संपर्कात आलेल्या केसेस आणि अनुभवांवरून ऑनलाइनच्या आभासी जगातील सायबर धोके समोर आणून त्याची माहिती करून देण्याचे काम पोलिसांनी केले आहे.पालकांना,   घरातील प्रौढ व्यक्तींना सर्वांत आधी ऑनलाइन धोक्यांची जाणीव करून द्या  आणि त्यापासून बचाव कसा करायचा हे शिकवणे ही आता काळाची गरज बनली आहे.'' असे मत कॉलेजेचे माजी विद्यार्थी मा.एस.एस.गजा ( पोलीस निरीक्षक, सायबर गुन्हे शाखा )  यांनी मांडले. संगणक विज्ञान विभागाने सायबर गुन्हे जागरूकता विषयी अतिथी व्याख्यान आयोजित केले होते त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर  ए.ए.नळेगावकर (सहायक पोलीस ...

संगमेश्वरमध्ये जागतिक पर्यटन दिन साजरा

इमेज
पर्यटन क्षेत्राला बळकटी मिळावी या उद्देशाने २७ सप्टेबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो. जगभर पर्यटन विकास अत्यंत वेगाने होत असून लोकांना मिळणाऱ्या सुट्यांच्या काळात वाढ झाली असून आर्थिक आवकही वाढत आहे. शिक्षण, निवास व्यवस्था व वाहतूक सुलभ झाल्याने पर्यटन विकासाला अमर्याद संधी आहे असे विचार इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी मांडले. संगमेश्वर कॉलेजमध्ये भूगोल विभागाच्या वतीने जागतिक पर्यटन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी कोकणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूगोल विभागप्रमुख डॉ. राजकुमार मोहरकर होते.  पुढे कोकणे म्हणाले की,'' प्रत्येकाने किमान १० गडकिल्ले सर करावे. पर्यटन करत असताना ते पर्यावरण पूरक असावे. पर्यटनात स्थानिक लोकांना व त्यांच्या सेवांना महत्व द्यावे. सोलापूर जिल्हा हा देखील अनेक पर्यटन स्थळांनी समृद्ध असून त्याचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सोलापूरात उत्पादित होणारे चादर, टॉवेल, कडक भाकरी, शेंगा चटणी या उत्पादनाचा प्रचार व प्रसार करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करता येतात.'' कायर्क...