पोस्ट्स

' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा संदेश लक्षात घ्या - डॉ.प्रियांका भराडे

इमेज
                              सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम सोलापूर प्रतिनिधी --- आरोग्य हेच खरे धन आहे. निरोगी नागरिक हेच कोणत्याही देशाचे खरे बळ असते. पण आजही अनेक आजार आपल्या समाजात पसरलेले आहेत, त्यांपैकी एक गंभीर आणि संसर्गजन्य आजार म्हणजे क्षयरोग (टीबी) होय. या आजाराचा नायनाट करण्यासाठी भारत सरकारने  ' टीबी हरेगा देश जीतेगा ' हा महत्त्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे. त्या अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये संगमेश्वर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ.प्रियांका भराडे यांनी मार्गदर्शन केले ते पुढे म्हणाल्या '' क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जीवाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो, परंतु शरीरातील इतर अवयवांनाही बाधित करू शकतो. सतत खोकला येणे, ताप, वजन कमी होणे, अशक्तपणा ही याची प्...

अ‍ॅनिमिया जनजागृती शिबिर आणि 'आरोग्य व पोषण' विषयक व्याख्यान

इमेज
  सोलापूर, दि.  ४ ऑक्टोबर २०२५  फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेच्यावतीने संगमेश्वर महाविद्यालयात रक्तातील हीमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फर्तपणे सहभाग नोंदविला आणि लाभ घेतला. विद्यार्थिनींमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, तसेच पोषणाच्या सवयी सुधाराव्यात, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाची सुरुवात सोलापुरातील प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ  डॉ. समन तांबोळी यांच्या व्याख्यानाने झाली. त्यांनी ‘आरोग्य आणि पोषण’ या विषयावर सखोल माहिती दिली. आहारातील मूलभूत घटक, अ‍ॅनिमिया टाळण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे, तसेच तणावमुक्त जीवनशैली यावर त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.तसेच १४७ विद्यार्थ्यांची एच.बी. चाचणी करण्यात आली.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, सोलापूर शाखेचे कार्यक्रम समन्वयक  विरेंद्र परदेशी आणि त्यांच्या टीमचे  मोलाचे योगदान लाभले. या उपक्रमाला संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा.ज्योती काडादी आणि महाविद्यालय...

संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे हिंदी पखवाड़ा निमित्त झालेल्या पुरस्कारवितरण समारंभ

इमेज
सोलापूर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय यांच्याशी केलेल्या करारानुसार (MOU), संगमेश्वर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे आयोजित हिंदी पखवाड़ा निमित्त  झालेल्या विविध स्पर्धांचे पुरस्कारवितरण समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. देवराव मुंडे उपस्थित होते. समारंभाचे अध्यक्षपद उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, हिंदी विभागप्रमुख डॉ. संघप्रकाश दुड्डे यांनी प्रस्तावना मांडून मुख्य पाहुण्यांचे स्वागत केले. उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी यांनी मुख्य पाहुणे डॉ. देवराव मुंडे यांचा यथोचित सन्मान केला. या समारंभाला डॉ. सारीपुत्र तुपेरे, डॉ. महानंदा बागले, डॉ. दादासाहेब खांडेकर हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. देवराव मुंडे यांनी सांगितले की, हिंदी आता संपूर्ण जगाची भाषा बनली आहे. हिंदी केवळ बोलचालीतच नव्हे तर व्यवहाराचीही भाषा बनली आहे. हिंदीमध्ये रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. १४ सप्टेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटनेत घटना...

स्पर्धा परीक्षेत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे - मयुरेश वाघमारे

इमेज
आयइएसमध्ये देशात आठवा आल्याबद्दल संगमेश्वरमध्ये सत्कार सोलापूर दिनांक ४ -  ''आजच्या युगात प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. शासकीय सेवा असो वा खाजगी क्षेत्रातील उच्च पदे — प्रत्येक ठिकाणी ज्ञान, कौशल्य आणि संयमाची कसोटी लागते. अशा स्पर्धात्मक वातावरणात यशस्वी होण्यासाठी केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नसते; त्यासोबत नियोजबद्ध अभ्यासातील सातत्य महत्वाचे आहे.'' असा सल्ला आयएएस श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या मयुरेश वाघमारे यांनी दिला.ते आयइएसमध्ये देशात आठवा,  महाराष्ट्रातून पहिला आल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. व्यासपीठावर संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी,  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्राचार्य प्रसाद कुंटे उपस्थित होते.         ते  विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले  '' सातत्य म्हणजे एखाद्या उद्दिष्टासाठी नियमित आणि ठरावीक वेळ देत राहणे. अभ्यासातील सातत्य म्हणजे रोजच्या दिनचर्येत अभ्यासाला ठराविक स्थान देणे, अभ्यासाच्या वेळेत विचलित न होणे आणि परिस्थिती ...

‘हिंदी दिवस’ निबंध स्पर्धेत आयेशा नासिर सय्यद प्रथम

इमेज
सोलापूर-  दिनांक १४ प्रतिनिधी भारत हा विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांनी समृद्ध असा देश आहे. येथे प्रत्येक राज्याची आपली एक स्वतंत्र भाषा आहे. तथापि, राष्ट्राला एकत्र आणणारी आणि संवादाची सुलभ साधने निर्माण करणारी भाषा म्हणून हिंदीची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. या भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी १४ सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो. हिंदी दिवसानिमित्त  संगमेश्वर कॉलेज हिंदी कनिष्ठ विभाग आयोजित निबंध स्पर्धेमध्ये  आयेशा नासिर सय्यद हिने प्रथम यरण्याचा मन मिळवला. पुढील निकाल याप्रमाणे ---  सायली दीपक शिरसाठ -द्वितीय, प्रज्ञा दिनकर वाघमारे- तृतीय ,मनोरमा सुरज कांबळे - उत्तेजनार्थ, किरण इस्माईल नदाफ- उत्तेजनार्थ, सादिया हाजीमलंग शेख - उत्तेजनार्थ.परीक्षक म्हणून हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ.संघप्रकाश दुड्डे यांनी सहकार्य केले.                                              स्पर्धा सुरु होण्यापूर्वी प्रा. शिवराज पाटील यांनी हिंदी भाषेचे महत्त्...

संगमेश्वरचा माजी विद्यार्थी मयुरेश वाघमारे आयइएस परीक्षेत देशात आठवा

इमेज
 आयएएस श्रेणीतील भारतीय आर्थिक सेवेत महाराष्ट्रातून एकमेव निवड सोलापूर : युपीएससीच्या आयइएस भारतीय आर्थिक सेवा म्हणजेच इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक पटकाविला आहे. एकूण १२ जागांसाठी देशभरातील ४ लाख ३० हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ही परीक्षा आयएएस श्रेणीतील असून महाराष्ट्रातून मयुरेश वाघमारे यांची एकमेव निवड झाली आहे. मूळचे सोलापूरचे तसेच सध्या अलिबाग येथे कार्यरत असलेल्या अपर जिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे ते चिरंजीव आहेत. युपीएससीकडून जून २०२५ मध्ये इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा लेखी निकाल ९ सप्टेंबर रोजी जाहीर झाला. त्यानंतर १६ सप्टेंबर रोजी वैद्यकीय परीक्षा घेण्यात आली. अखेर मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालानंतर केंद्रीय वित्त मंत्रालयात तसेच रिझर्व्ह बँकेत मयुरेश वाघमारे यांची निवड होऊ शकते. मयुरेश वाघमारे यांनी इंग्लंड येथून ॲग्रीकल्चर ॲडव्हान्स्ड इकॉनाॅमिक्स या विषयात पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण सुयश विद्यालय येथे...

प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते. ---ईशान मेरू

इमेज
भारतीय व्यवस्थापन संस्था इथे निवडीबद्दल संगमेश्वर कॉलेजमध्ये सत्कार  सोलापूर प्रतिनिधी -- ''भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्थामध्ये निवड होण्यासाठी प्रामाणिक जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर IIM चे स्वप्न नक्कीच पूर्ण होते''. असे प्रतिपादन संगमेश्वर कॉलेजचा माजी विद्यार्थी क्रीडापटू ईशान वैभव मेरू यांनी केले. भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM  मध्ये निवड झाल्याबद्दल त्याचा कॉलेजच्या वतीने सत्कार संस्थेच्या सचिव प्रा. ज्योती काडादी करण्यात आला. त्याप्रसंगी तो बोलत होता. याप्रसंगी व्यासपीठावर उपप्रचार्य प्रसाद कुंटे पर्यवेक्षक डॉ. मल्लिनाथ साखरे, वैभव मेरू, डॉ.राजश्री मेरू आदी उपस्थित होते.  त्याप्रसंगी बोलताना उप्राचार्य प्रसाद कुंटे म्हणाले की '' भारतीय व्यवस्थापन संस्था म्हणजेच IIM या भारतातील नामांकित आणि उच्च दर्जाच्या संस्था आहेत. व्यवस्थापनशास्त्र शिकण्यासाठी आणि मोठ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदांवर काम करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की, त्यांनी IIM मध्ये प्रवेश मिळवावा. मात्र या स्वप्नासाठी प्रच...