पोस्ट्स

मसाप सोलापूर आयोजित "श्रावणधारा" जिल्हास्तरीय काव्य स्पर्धा संपन्न

इमेज
 कविता हा अभ्यासपूर्ण व गंभीर साहित्यप्रकार : समीर गायकवाड  विद्यार्थ्यांनी आपला आवडता साहित्यप्रकार काव्यलेखनाच्या संदर्भात सर्वप्रथम भरपूर वाचन केले पाहिजे. त्यानंतर त्या कविता समजून घेऊन चिंतन, मनन करून आपल्यामध्ये साहित्य प्रतिभा रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तदनंतर काव्य लेखन हे अधिक चांगले व निश्चितच गुणवत्ता पूर्ण होईल. कविता-काव्यलेखन हा अभ्यासपूर्ण व गंभीर साहित्य प्रकार असून त्यासाठी वाचन व साहित्य व्यासंग असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन उद्घाटक ज्येष्ठ ब्लॉगर लेखक समीर गायकवाड यांनी श्रावणधारा या मसाप आयोजित जिल्हास्तरीय काव्य स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर मसापच्या अध्यक्षा डॉ. श्रुती वडगबाळकर, कार्याध्यक्ष किशोर चंडक, संगमेश्वर महाविद्यालय उपप्राचार्य डॉ. सुहास पुजारी, कोषाध्यक्ष व युवा विभाग प्रमुख प्रा. डॉ. नरेंद्र काटीकर, स्पर्धाप्रमुख प्रा. भीमगोंडा पाटील आदी उपस्थित होते.  सर्वप्रथम कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने झाले. त्यावेळी सरस्वती स्तवन प्रा. श्रुती देवळे यांनी केले. प्रास्ताविकात डॉ. काटीकर यांनी...

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणरायाचे आगमन

इमेज
कॉलेजच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'रंग गणेशाचा' या चित्रप्रदर्शनाचे आयोजन  सोलापूर प्रतिनिधी -  कर्मयोगी अप्पासाहेब काडादी चित्रकला महाविद्यालयात गणरायाचे आगमन झाले. विधीवत प्राणप्रतिष्ठापना संस्थेचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी केले. याप्रसंगी प्राचार्य सचिन गायकवाड,  वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य  ऋतुराज बुवा, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रसाद कुंटे,निवृत्त उपप्राचार्य आनंद हुली ,निवृत्त कलाशिक्षक मल्लिनाथ बिलगुंदी, चित्रकार प्रा. देवेंद्र निम्बर्गीकर,  प्रा. मीनाक्षी रामपुरे उपस्थित होते.  प्रारंभी कला महाविद्यालयाच्या बाहेरील बाजूस नामवंत चित्रकारांच्या व्यक्तीचित्राचे आणि कर्मयोगी    अप्पासाहेब काडादी यांच्या पोट्रेटचे अनावरण झाले. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवानिमित्त काढलेल्या 'रंग गणेशाचा' या चित्रप्रदर्शनाचेही  उद्घाटन यावेळी करण्यात आले.  गणरायाची आरती झाली. कला महाविद्यालयाची गणेशोत्सवाची परंपरा  आणि पंचवीस वर्षाचा धावता आढावा घेत देवेंद्र निम्बर्गी यांनी  प्रास्ताविक केले.  प्रास्ताविकानंतर चित्र...

वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.भाग्यश्री संगप्पा आळगे हिने पटकावला द्वितीय क्रमांक

इमेज
सोलापूर प्रतिनिधी -  श्री आचार्य शांतीसागर पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा फंड श्राविका संस्था नगर सोलापूर यांच्या वतीने आयोजित केलेल्या 69 वी आचार्य श्री शांतिसागरजी महाराज पुण्यतिथी वक्तृत्व स्पर्धा २०२४  स्पर्धेमध्ये कु.भाग्यश्री संगप्पा आळगे या विद्यार्थिनीने कनिष्ठ महाविद्यालय गटात द्वितीय क्रमांक मिळवला.कु.संगीता रेवप्पा होटगे हिनेही उत्तम तयारी करून सादरीकरण दिले. भाग्यश्री अकरावी विज्ञान शाखेत शिकते. तिला पुढे जाऊन  स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहे.तिचं शालेय शिक्षण सिद्धेश्वर कन्या प्रशालेत झाल असून बाबा तिचे शिक्षक  आहे त   . असं असतानाही  तिने स्वप्न उराशी बाळगले की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं . ध्येय निश्चिती करून मार्गक्रमण करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांचा नक्कीच अभिमान वाटतो. आपल्या मनगटात कर्तृत्वाचे बळ निर्माण करण्याचे हेच क्षण असतात म्हणून महाविद्यालयीन जीवनात  बोलता बोलता  व्यक्तिमत्व खुलवता आलं पाहिजे. हे या विद्यार्थ्यांकडून  आपल्याला शिकायला मिळतं. तिच्या यशाबद्दल संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  धर्मराज काडादी , स...

कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा

इमेज
     प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही दैनिक संचार प्रबोधन मंच, संगमेश्वर कॉलेज (स्वायत्त) आणि कर्मयोगी अप्पासाहेब नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  कर्मयोगी अप्पासाहेब काडादी यांच्या ११५ व्या जयंती निमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन उस्फुर्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस २५०१ , द्वितीय क्रमांक १५०१  तृतीय क्रमांक १००१, चौथा क्रमांक ७५१ पाचवा,क्रमांक ५५१, सहा क्रमांक ५०१ रुपये तर  उत्तेजनार्थ दोन प्रशस्तिपत्रके अशी बक्षिसे आहेत.  ही स्पर्धा महाविद्यालयातील वरिष्ठ आणि कनिष्ठ  विभागातील सर्व शाखांच्या विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी खुली असून  प्रत्येक महाविद्यालयास वरिष्ठ महाविद्यालयातील दोन आणि कनिष्ठ महाविद्यालयातील दोन असे चार स्पर्धक पाठवता येणार आहेत. प्रत्येक स्पर्धकास ऐन वेळेस विषय दिला जाईल.  विचार करण्यासाठी विद्यार्थ्यास पाच मिनिटे वेळ दिला जाईल आणि बोलण्यास पाच मिनिटे वेळ दिला जाईल. स्पर्धकांचे प्रवेश अर्ज  त्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत  पाठवावेत. स्पर...

संगमेश्वर कॉलेजला विद्यापीठाचा डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक

इमेज
क्रीडा क्षेत्रातील सलग उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यार्थ्यांचा झाला सन्मान सोलापूर क्रीडा प्रतिनिधी -   डॉ. पुरणचंद पुंजाल  चषक  प्रतिवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने  क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॉलेजला दिला जातो. विद्यापीठाने पुरस्कार सुरू केल्यापासून सलग  हा मान संगमेश्वर कॉलेजला मिळाल्याने  संस्थेच्या वतीने  क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.  प्रारंभी डॉ. पुरणचंद पुंजाल चषक  घेऊन विद्यार्थ्यांनी मैदानावर जल्लोष केला. ही जल्लोषाची रॅली कॉलेजच्या मुख्य इमारती जवळ आली. तिथे सत्काराचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.ऋतुराज बुवा यांनी केले. त्यात त्यांनी  संगमेश्वर कॉलेजच्या शिवाजी विद्यापीठापासूनच्या दैदीप्यमान परंपरेची माहिती देत. आपणही या  विभागाचे एकेकाळचे  खेळाडू होतो, याची  आठवण करून देत  क्रीडा विभागातील  सर्व यशस्वी खेळाडूंचे  अभिनंदन केले. पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ...

डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक सलग मिळवण्याचा मान संगमेश्वर कॉलेजला

इमेज
 क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल विद्यापीठाने  केला गौरव  --पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात आला. त्यामध्ये यावर्षी विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वोत्कृट कामगिरी केल्याबद्दल संगमेश्वर कॉलेजला पुरस्कार सुरू झाल्यापासून सलग डॉ. पुरणचंद्र पुंजाल फिरता चषक प्रदान करण्यात आला.  या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजी विद्यापीठातील  प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे,प्रभारी क्रीडा  संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे मान्यवर उपस्थित होते. संगमेश्वर कॉलेजच्या वतीने प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, क्रीडा विभागाचे प्रमुख प्रा. आनंद चव्हाण आणि यशस्वी खेळाडू मोठया संख्येने उपस्थित होते.  संगमेश्वर कॉलेजला उज्जवल, गौरवशाली क्रीडा परंपरा आहे. गेली अनेक वर्षे आंतरराष्ट्रीय पातळीवर यश संपादन करणारे खेळाडू कॉलेजमधून घडलेले आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन आणि संधी...

विद्यार्थ्यांनी अल्कोहोल इंडस्ट्रीतील नव्या संधींचा फायदा घ्यावा - उत्कर्ष भावसार

इमेज
संगमेश्वर मध्ये अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स प्रमाणपत्र प्रदान समारंभ संपन्न सोलापूर प्रतिनिधी -  आजच्या काळात व्यावसायभिमुख शिक्षण महत्त्वाचे बनलेले आहे. कौशल्यावर आधारित कोर्सच्या माध्यमातून याची पूर्तता होते. अलीकडे साखर उद्योगाबरोबर अल्कोहोल इंडस्ट्रीज ही नवीन शाखा निर्माण झालेली आहे.  त्यामध्ये अनेक संधी उपलब्ध झालेल्या आहेत. अल्कोहोल टेक्नॉलॉजी डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी साखर कारखान्यांमध्ये नोकरीचा शोध घेण्याबरोबर अल्कोहोल क्षेत्रातील नव्या संधींचा फायदा घ्यावा असे विचार फ्रट्रेली कंपनीचे सहायक व्यवस्थापक  मा. उत्कर्ष भावसार यांनी मांडले.  संगमेश्वर कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२- २०२३ पासून सुरू केलेल्या पोस्ट् ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इन्डेस्ट्रीयल फर्मेनटेशन अल्कोहोल टेक्नॉलॉजी च्या पहिल्या बॅचच्या प्रमाणपत्र वाटप समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा. धर्मराज काडादी होते. या प्रसंगी सौ. श्रुतिका भावसार, सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकार...