पोस्ट्स

राज्यस्तरीय Aqua Regia Competition मध्ये ऋग्वेद देशमुख आणि सिकंदर बिराजदार विजेते

इमेज
 सोलापूर प्रतिनिधी -    Triumphant Institute of Management Education  वतीने  राज्यस्तरीय Aqua Regia Competition  घेण्यात आली होती. ही प्रश्नमंजुषा स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली.यामध्ये  संगमेश्वर कॉलेजच्या संघातल्या ऋग्वेद देशमुख आणि  सिकंदर बिराजदार विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. पुरस्काराचे स्वरूप रुपये दहा हजार आणि स्मृतिचिन्ह  असे असून त्यांची निवड मुंबई येथे होणाऱ्या विभागीय  स्पर्धेसाठी झालेली आहे.    Triumphant Institute of Management Education    संस्थेच्या वतीने  ही शहरस्तरीय स्पर्धा प्रथम झाली. त्यानंतर राज्यस्तरीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली . राज्यस्तरीय स्पर्धा सिम्बॉयसिस कॉलेजच्या  प्रांगणातील  सभागृहात संपन्न झाली.  या  प्रश्नमंजुषा स्पर्धेत  चालू घडामोडी, भारताचा आणि जगाचा भूगोल ,खेळ, चित्रपट  यासारख्या विषयांवर प्रश्न विचारण्यात आले. Triumphant Institute of Management Education टाइम संस्था सोलापूर शाखेचे प्रमुख प्रा.आनंद जोशी यावेळी उप...

संगमेश्वर महाविद्यालयाची विभागीय तलवारबाजी स्पर्धेत ५ पदकांची कमाई

इमेज
सोलापूर, दि. १३ ऑक्टोबर- विभागीय शालेय तलवारबाजी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कनिष्ठ म हाविद्यालयाच्या खेळाडूंनी ३ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य अशी ५ पदकांची कमाई केली. या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण, शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा. संतोष खंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा. शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन धर्मराज काडादी, सचिवा ज्योती काडादी, प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा. प्रसाद कुंटे आदींनी अभिनंदन केले. कामगिरी : सेबर: समृद्धी घाळे (सुवर्ण), श्रुतिका चव्हाण (रौप्य), श्रेयस तळभंडारे (सुवर्ण), व्यंकटेश खंडेलवाल (कांस्य). फॉईल सुमित जाधव (सुवर्ण).

संगमेश्वर कॉलेजचे मैदानी स्पर्धेमध्ये 18 मेडल

इमेज
         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय शहर स्तर मैदानी स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या  खेळाडूंनी विविध प्रकारात 18 मेडल पटकावले          यामध्ये यश साळुंखे 110 हार्डल्स प्रथम ,चारशे हार्डलस तृतीय ,चारशे रिले प्रथम, शंभर रिले द्वितीय, मंथन जूटलिंगे  400 हर्डल्स द्वितीय चारशे रिलेप्रथम 110 हार्डलस द्वितीय ,गोसदेव काळे 800 मीटर 1500 मीटर धावणे प्रथम 400 रिले प्रथम,  सिकंदर बिराजदार चारशे रिले प्रथम,  ओंकार घोडके हाय जंप ट्रिपल जंप प्रथम , तेजस पवार हॅमर थ्रो प्रथम मुलींमध्ये पुनम उपासे लॉंग जंप प्रथम 100 रिले तृतीय, प्राची भरले 100 रिले तृतीय, प्रियंका तलवार 100मी. हार्डलस प्रथम, निकिता कुलकर्णी बांबू उडी प्रथम, वैभवी धोत्रे गोळा फेक तृतीय, समृद्धी बनसोडे थाळी फेक द्वितीय, , रक्षिता घुगरे 400 हर्डलस द्वितीय, नर्गिस उस्ताद 100 रिले तृतीय असे एकूण सर्व खेळाडूंनी 18 पथके मिळवले         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद च...

संगमेश्वर कॉलेजचा संघ हँडबॉल स्पर्धेत प्रथम

इमेज
         क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर आयोजित शालेय  शहरस्तरीय हँडबॉल स्पर्धेमध्ये संगमेश्वर कॉलेजच्या  खेळाडूंनी विजेतेपद पटकावले          या संघामध्ये सुंदर कट्टीमनी, अभिषेक सिंग, ओम देवकांबळे, हर्षद माने, तेजस पवार, अजय जाधव, विजय जाधव, उमरान पेरमपल्ली, आर्यन सोनकांबळे, अनिकेत भोसले, ओम कोळी, सोहम लब्बा या खेळाडूने विजेतेपद पटकावून दिले         या खेळाडूंना शारीरिक शिक्षण संचालक डॉ. आनंद चव्हाण ,शारीरिक शिक्षण शिक्षक प्रा.संतोष खेंडे, प्रा. विक्रांत विभुते व प्रा.शरणबसवेश्वर वांगी यांचे मार्गदर्शन लाभले.        या खेळाडूंना श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन  धर्मराज काडादी ,सचिवा ज्योती  काडादी, प्राचार्य  डॉ .ऋतुराज बुवा, उपप्रचार्य प्रा.प्रसाद कुंटे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले फोटोओळी   प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा ,उप प्राचार्य  प्रसाद कुंटे ,शारीरिक शिक्षण संचालक ...

संगमेश्वर कॉलेजमध्ये SVEEP स्वीप टीम - २४९ शहरमध्य विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मतदार जनजागृती

इमेज
  सोलापूर शहर प्रतिनिधी -   संगमेश्वर कॉलेजमध्ये SVEEP  स्वीप टीम - २४९ शहरमध्य विधानसभा मतदार संघ यांच्या वतीने मतदार  जनजागृती  करण्यात आली. प्रारंभी नोडल अधिकारी कादर शेख यांनी   ऑनलाईन पद्धतीने  कशाप्रकारे मतदार नाव नोंदणी करता येते याविषयी सविस्तर  संवाद साधला.  त्यानंतर  उपस्थित सर्व नव मतदार विद्यार्थ्यांना प्रकाश राचेटी  यांनी मतदानाची शपथ दिली.  त्यानंतर  प्र.प्राचार्य ऋतुराज बुवा यांनी या अभियानाबद्दल जिल्हा निवडणूक कार्यालयाचे जनजागृती  अभियान बद्दल  आभार मानले.  संतोष खेंडे यांनी सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.  या मतदार जनजागृती अभियानामध्ये कादर शेख (नोडल अधिकारी २४९  विधानसभा मनदार संघ  -  शिक्षणाधिकारी प्राथमिक ) ,गोदावरी राठोड ( शिक्षण विस्तार अधिकारी ), स्वाती स्वामी ( शिक्षण विस्तार अधिकारी ) ,  संतोष खेंडे आनंद सामल अमोल भोसले,सचिन शिदोरे ,अ. रज्जाक बेदरेकर ,मल्लिकार्जुन हिरेमठ यांचा समावेश आहे.याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य  प्रस...

संगमेश्वरमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या वतीने अग्निशमन प्रात्यक्षिके

इमेज
 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे डोळे दिपवणारे  प्रात्यक्षिक सोलापूर संचार प्रतिनिधी -  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल एनटीपीसी शाखेच्या वतीने  संगमेश्वर कॉलेजमध्ये  अग्निशमन यंत्रणा कशी काम करते आणि आग विझवण्यासाठी आपण कोणकोणत्या खबरदारी  घ्याव्यात.  या संदर्भात प्रात्यक्षिकाचे आयोजन  केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या  आग प्रतिबंधक विभाग नॅशनल थर्मल पावर कॉर्पोरेशन , फताटेवाडी  ( एनटीपीसी )  शाखेच्या वतीने  करण्यात आले. यामध्ये प्रारंभी  फायर इन्स्पेक्टर संतोष एम.अरविंद यांनी  प्रास्ताविक केले.                    या प्रास्ताविकात त्यांनी या प्रात्यक्षिक व सरावाचा हेतू स्पष्ट केला.९ महाराष्ट्र एनसीसी  बटालियन ,राष्ट्रीय सेवा योजना कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी हे प्रात्यक्षिक कॉलेजच्या प्रांगणात सादर करण्यात आले.यामध्ये  फायर इन्स्पेक्टर संतोष एम अरविंद, सुमित अतिग्रे, पी. के. वाघ, सौमिक कुमार,  विकास मोरे, जे.के. गगराई...

समृद्ध कलापरंपरा जोपासण्यासाठी सज्ज व्हा ---धर्मराज काडादी

इमेज
युवा महोत्सवातील संगमेश्वरच्या कलाकारांचा गौरव सोलापूर   सोलापूर प्रतिनिधी - ''आपल्या कॉलेजची कलाक्षेत्रातली परंपरा समृद्ध आहे. या युवा महोत्सवातून कित्येक कलाकार घडले.    वैविध्यपूर्ण कलांना प्रोत्साहन देण्यासाठी संगमेश्वर कॉलेजचे व्यवस्थापन कटिबद्ध आहे. येणाऱ्या काळात उत्तम सभागृहांची व्यवस्था होणार आहे. सुसज्ज भौतिक सुविधा आपल्या विद्यार्थ्यांना आपण सादरीकरणासाठी कक्ष उपलब्ध करून देत आहोत. त्यामुळे संगमेश्वरची विद्यापीठांमधील समृद्ध  कला परंपरा जोपासण्यासाठी सज्ज व्हा." असे आवाहन संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष  धर्मराज काडादी यांनी केले. ते नुकत्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या  विसाव्या युवा महोत्सवात उपविजेता  संघातील विद्यार्थ्यांच्या गौरव कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी  प्राचार्य डॉ. ऋतुराज बुवा, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. दादासाहेब खांडेकर  आदी मान्यवर उपस्थित होते.   प्रारंभी युवा महोत्सवातील  क्रमबद्ध कार्यक्रमाची माहिती सांस्कृतिक विभाग प्रमुख  दादासाहेब खांडेकर यांनी करून दिली. ...