अल्कोहोल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम तृतीय बॅच प्रमाणपत्र वितरण समारंभ
अडचणींना संधी मानून यशाचा मार्ग शोधा संगमेश्वरमधील कार्यक्रमात जाधव यांचा विद्यार्थ्यांना संदेश संचार प्रतिनिधी सोलापूर, दि. ४-सोलापूर, दि. ४- कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते. कोणतेही काम करण्यास कमीपणा न मानता प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी ठेवली, तर निश्चितच यश मिळते. जीवनात अडचणी आल्या तरी डगमगून न जाता त्याकडे संधी म्हणून पाहून यशाचा मार्ग शोधला पाहिजे, असा प्रेरणादायी संदेश जकराया शुगरचे चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिला. संगमेश्वर स्वायत्त महाविद्यालयातील अल्कोहोल टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाच्या तृतीय बॅचच्या प्रमाणपत्र वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संगमेश्वर शिक्षण संस्थेचे चेअरमन धर्मराज काडादी होते. जाधव म्हणाले, उद्योग क्षेत्राच्या गरजा आणि विद्यार्थ्यांना मिळणारे पारंपरिक ज्ञान यातील तफावत दूर करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी उद्योगाच्या गरजा समजून घेत तांत्रिक कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव आत्मसात करावा. शुगर व डिस्टिलरी उद्योगातील सद्यःस्थिती,...